हॅलो पान 1 : ‘कणको’ बेट नष्ट होणार?
By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST
कोणताही प्रकल्प उभारल्यास पाळोळेवासियांचा विरोध
हॅलो पान 1 : ‘कणको’ बेट नष्ट होणार?
कोणताही प्रकल्प उभारल्यास पाळोळेवासियांचा विरोधदिवाकर देसाई : पाळोळेपाळोळे गावाचे वादळ वार्यापासून संरक्षण करणारे ‘कणको बेट’ हे उरेल की नाही, अशी भीती आता पाळोळेवासियांना पडली आहे; कारण हे बेट आता गोव्याबाहेरील व्यक्तींनी विकत घेतले आहे. या जागेवर हॉटेलसारखे प्रकल्प उभारण्याची तयारी त्यांनी चालविल्याचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी यांनी सांगितले. या जागेवर कोणत्याही प्रकारचा प्रकल्प उभारल्यास त्यास आमचा विरोध असेल आणि बळजबरीने करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो हाणून पाडू, असेही पागी म्हणाले.‘कणको बेट’ हे पाळोळेवासियांना एक वरदानच आहे. कोणत्याही प्रकारचे वादळ येवो अथवा कितीही जोराचा वारा आला तरी या बेटापासून पाळोळे गावचे रक्षण होत असे. जर या जागेवर हॉटेल होत असेल तर त्याचे सपाटीकरण होणार म्हणजे बेटाची उंची कमी होणार. त्यामुळे पर्यावरणाचा अधिक र्हास होऊ शकतो. त्याची नैसर्गिकता नष्ट होऊन ते एक काँक्रिटचे जंगल बनणार आहे. मध्यंतरीच्या काळात येथील झाडे कापून डोंगर बोडका केल्याचे निदर्शनास आले होते आणि ही गोष्ट आम्ही संबंधितांच्या नजरेस आणून दिली होती; पण येथे काहीतरी होण्याच्या हालचाली आता स्पष्ट दिसत असल्याचे दयानंद पागी यांनी सांगितले.डोंगरावर आमचे पूर्वज गुरे चारण्यासाठी नेत असत. मच्छीमारी समाजाचे लोक मासळी मारण्यासाठी त्याचा उपयोग करत असत व अजून काही शेतकरी डोंगरावर गुरे चारण्यासाठी नेतात. काही मच्छीमार मासळीही मारत असतात. या सर्वांवर बंधन येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच जागेवर सर्व प्रकारची जनावरे दृष्टीस पडतात. त्याचबरोबर सरपटणारे प्राणीही मोठय़ा प्रमाणात आहेत. जर या जागेवर मानवी वस्तीचे अतिक्रमण झाले तर येथील जनावरे गावात पोहोचण्याचा धोका संभवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.पालिकेकडून त्यांना परवाना मंजूर झाल्याचे आम्हाला समजले आहे; पण प्रत्यक्ष पालिकेकडून परवाना घेऊन त्यांनी कामाला प्रारंभ केला तर येथील जनता पोटतिडकीने त्याच्याविरुध्द आवाज उठविण्याच्या तयारीत असल्याचेही पागी यांनी सांगितले. शेवटी कोणत्याही परिस्थितीत येथील प्रकल्प आम्ही होऊ देणार नाहीत. तसेच येथील वनराई नष्ट केल्यास पर्यावरणाचा र्हास हा निश्चित आहे.ढँ3 : 2008-टअफ-01कॅप्शन: वादळ वार्यापासून पाळोळे गावचे रक्षण करणारे कडको बेट. (छाया: दिवाकर देसाई)