हॅलो 4- प्रकाश पर्येकर यांना पीएचडी
By admin | Updated: September 9, 2015 01:42 IST
पणजी : ‘महाबळेश्वर सैल यांच्या कादंबर्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन’ या विषयावर शोध-प्रबंध सादर केलेले प्रकाश प्रा. शांबा पर्येकर हे गोवा विद्यापीठाच्या ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ या पदवीसाठी पात्र ठरले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सैल यांच्या ‘काळी गंगा’ (1996), ‘युग-सांवार’ (2004), ‘खोल खोल मुळां’ (2005) आणि ‘हावठण’ (2009) या कादंबर्यांचा प्रबंधात समाजशास्त्रीय अभ्यासाची पद्धत वापरून संशोधन केले आहे. कारवार प्रांताचा वारसा लाभलेल्या या साहित्याचे पर्येकर यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन समाजव्यवस्थेचे वास्तव रूप पडताळून पाहिले आहे.
हॅलो 4- प्रकाश पर्येकर यांना पीएचडी
पणजी : ‘महाबळेश्वर सैल यांच्या कादंबर्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन’ या विषयावर शोध-प्रबंध सादर केलेले प्रकाश प्रा. शांबा पर्येकर हे गोवा विद्यापीठाच्या ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ या पदवीसाठी पात्र ठरले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सैल यांच्या ‘काळी गंगा’ (1996), ‘युग-सांवार’ (2004), ‘खोल खोल मुळां’ (2005) आणि ‘हावठण’ (2009) या कादंबर्यांचा प्रबंधात समाजशास्त्रीय अभ्यासाची पद्धत वापरून संशोधन केले आहे. कारवार प्रांताचा वारसा लाभलेल्या या साहित्याचे पर्येकर यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन समाजव्यवस्थेचे वास्तव रूप पडताळून पाहिले आहे.माजाळी कारवार भागातील महाबळेश्वर सैल 1961 मध्ये भारतीय सैन्यात रुजू झाले. 1965च्या भारत-पाक युद्धात सहभागी झालेले सैल पुढे 1967 साली कामानिमित्त गोव्यात आले. प्रथम मराठी भाषेत कथा आणि नाट्यलेखन केल्यानंतर 1982 पासून कोकणी कथा लेखनास प्रारंभ केला. कोकणी भाषेतील ते एक महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. ‘तांडव’ कादंबरीच्या माध्यमातून मराठी वाचकवर्गात ते परिचित आहेत.कोकणी ग्रामीण कथाकार म्हणून नाव कमावलेल्या पर्येकर यांना नवी दिल्लीचा राष्ट्रीय कथा पुरस्कार, लखनौचा पंडित प्रतापनारायण मिर्श-स्मृती साहित्यकार सन्मान, मुंबईचा कविवर्य पद्मर्शी बा. भ. बोरकर स्मृती पुरस्कार, मणिपाल कर्नाटक यांचा टीएमए पै फाऊंडेशन्स पुरस्कार, साहित्य अकादमी नवी दिल्लीचा बालसाहित्य पुरस्कार, गोवा कोकणी अकादमीचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, तसेच इतर काही पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ‘दवरणे’, ‘इगडी बिगडी तिगडी था’, ‘म्हादय : काळजांतल्यान कागदार..’ तसेच ‘आमचे आमी’ अशी त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झाली असून सध्या ते गोवा विद्यापीठात कोकणी विभाग प्रमुख आहेत.त्यांच्या या शोध-प्रबंधाला डॉ. चंद्रलेखा डिसोझा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सत्तरी तालुक्यात कोकणी विषयात पीएचडी केलेले ते पहिलेच सुपुत्र असून त्यांच्या या यशासाठी सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.