हॅलो १
By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST
मोरजीत रविवारी शेतीविषयक मार्गदर्शन
हॅलो १
मोरजीत रविवारी शेतीविषयक मार्गदर्शनमांद्रे : हरमल येथील आधार बहुउद्देशीय पतसंस्थेतर्फे रविवार, दि. २८ रोजी दुपारी ३.३० वा. शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर मोरजी येथील देवीचा मांगर सभागृहात घेण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन सुजय गोकर्णकर यांनी दिली आहे. या वेळी कृषी खात्याचे विभागीय अधिकारी रघुनाथ जोशी, पेडणे शेतकी खात्याच्या सहाय्यक अधिकारी सोनिया मोटे, किसान संघटना गोवा राज्य प्रभारी व गोमंत गोसेवा महासंघाचे अध्यक्ष कमलाकांत तारी, भारत स्वाभिमान गोवा राज्य प्रभारी कमलेश बांदेकर आदींचे शेतकर्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.