शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो 1- विधानसभेतून

By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST

पांढरा हत्ती

पांढरा हत्ती
सरकार क्रीडा सुविधांच्या नावाखाली फक्त मोनुमेन्टन तयार करत आहे, अशी टीका डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. गोव्यात सरकारने फुटबॉल अकादमी उभी करावी, अशी आमदार सावळ यांची मागणी होती. त्यावर क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सकारात्मक उत्तर दिले; पण ‘अनेकदा सावळ हेच आमच्या क्रीडा सुविधांना पांढरा हत्ती म्हणतात,’ असे तवडकर म्हणाले. मग तवडकर यांनी बांबोळी येथे उभारलेल्या स्टेडियमचे उदाहरण दिले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी या वेळी हळूहळू प्रॉम्पटिंग करत आणखी काही प्रकल्पांची उदाहरणे तवडकर यांना सुचविली.
अहो, बांबोळी व अन्यत्र उभारलेल्या मोठय़ा स्टेडियमचा वापर गोव्यातील खेळाडूंना होतो तरी काय, अशी विचारणा सावळ यांनी केली. या वेळी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे उभे राहिले. होय, मोठे स्टेडियम प्रकल्प हे पांढरे हत्तीच झाले आहेत. त्यांच्या देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. तुम्ही हा पैसा गोव्यातील खेळाडूंवर खर्च करा, असे खंवटे म्हणाले.
या वेळी विरोधकांना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उत्तर दिले. तत्पूर्वी सावळ यांनी सरकार जे स्टेडियम उभे करतेय ते लोकांचे पैसे आहेत, असा शेरा मारला होता. तेच सूत्र पकडून मुख्यमंत्र्यांनी हे पैसे आमच्या खिशातील आहेत, असे आम्ही म्हणत नसल्याचे नमूद केले. आम्ही जी पाच ग्रामीण मैदाने विकसित केली त्यांचा लाभ स्थानिक खेळाडूंना होत नाही काय, असा प्रतिप्रश्न पार्सेकर यांनी अपक्ष आमदारांसमोर ठेवला. आमच्या सरकारने लोकांचा पैसा न्याय्य पद्धतीने वापरला. यापूर्वी ज्यांनी योग्य पद्धतीने लोकांचा पैसा वापरला नाही, ते आता भोगत आहेत, असे पार्सेकर म्हणाले. त्यांनी कुणाच्या नावाचा उल्लेख केला नाही; पण लुईस बर्जर प्रकरण व कामत-चर्चिलचा संदर्भ देत आहेत हे कळत होते. सत्ताधारी भाजप आमदारांना हसू फुटले. विधानसभा अधिवेशन सुरू असताना ते बाहेर आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सायंकाळी अनुदानित मागण्यांवरील चर्चेस उत्तर देतानाही सावळ यांना टोमणा मारला. आयटी उद्योग गोव्यात आणण्याच्या गोष्टी आम्ही गेली पंधरा वर्षे ऐकत आहोत, असे सावळ म्हणाले होते. पंधरा वर्षे नरेश विधानसभेत नव्हता; पण तो डिचोलीत टीव्हीसमोर बसून गोष्टी ऐकत होता, असे पार्सेकर म्हणाले. मंत्र्यांना उगाच बदनाम करू नका, सुके आरोप करू नका, असा सल्ला पार्सेकर यांनी सर्वच सदस्यांना निरोपाच्या संदेशावेळी दिला. निरोपाचा संदेश आम्ही अशासाठी म्हणतो; कारण शुक्रवारी अधिवेशनातील कामकाजाचा समारोप झाला. त्या वेळी पार्सेकर खूप प्रभावीपणे व समतोल बोलले हे नमूद करावे लागेल.
आम्हाला अधिवेशनात बोलायला जास्त वेळ मिळायला हवा, असे मतप्रदर्शन करण्याची संधी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी सोडली नाही. काब्राल हे यावेळच्या पूर्ण अधिवेशनात खूप मनापासून आणि पोटतिडकीने बोलले आहेत. अनेक गंभीर मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. सरकारी कर्मचार्‍यांना आम्ही लवकर घरी जाऊ नका, असे सांगत असतो. मग विधानसभेत आम्ही आमदारांनी सायंकाळी सहा वाजता काम संपविण्याची घाई का करावी, अशी विचारणा काब्राल यांनी केली. या वेळी पार्सेकर त्यांच्याकडे पाहून हसू लागले. ‘माझी रात्री बारा वाजेपर्यंत इथे सभागृहात थांबण्याची तयारी आहे. आमदारांना पाच मिनिटांत किंवा तीन मिनिटांत बोलून विषय संपविण्याचे बंधन लागू केले जाऊ नये,’ अशी अपेक्षा काब्राल यांनी व्यक्त केली.