शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

हेलो 1 : गोमंतकीय आयपीएस बनण्यास अनुत्सुक

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

डीआयजी व्यास यांची खंत

डीआयजी व्यास यांची खंत
पणजी : गोव्यात बुद्धिमत्तेची वाण नाही; परंतु गोव्यातील तरुणांचा गोव्याबाहेर काम करण्याचा कल कमी असल्यामुळे आयपीएस सेवेत गोमंतकीय युवक दाखल होत नसल्याची खंत पोलीस उपमहानिरीक्षक व एसआयटीचे प्रमुख म्हणून पदभारातून नुकतेच मुक्त झालेले के. के. व्यास यांनी व्यक्त केली. दिल्ली येथे बदली फर्मावण्यात आलेले व्यास यांनी गोव्याचा निरोप घेण्यापूर्वी ‘लोकमत’च्या कार्यालयात दिलखुलास गप्पा केल्या.
गोव्यातील तरुण गोव्याबाहेर जाण्यास कमी इच्छुक असतात. त्यामुळेच आयपीएसमध्ये गोव्यातील तरुणांची संख्या कमी आहे. अर्थातच बुद्धिमत्तेच्या बाबतीत गोवा मागे नाही. आवश्यक प्रमाणात जागृती केल्यास गोव्यातूनही पुढे आयपीएस निघतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यासाठी स्वतंत्र आयपीएस कॅडर बनविण्याएवढी गोव्याची लोकसंख्या नाही, असे ते म्हणाले.
गोव्यातील माझा सेवाकाळ हा अत्यंत चांगला राहिला. येथील लोक फार चांगले आहेत. येथे आंदोलकही नीतिमत्ता पाळून आंदोलन करतात, ही गोष्ट मी पहिल्यांदाच पाहिली. गोव्यात इतर ठिकाणाहून अतिरेकी, नक्षलवादीही सराईत येऊन राहिले असले तरी गोवा हे अशा लोकांसाठी सुरक्षित ठिकाण असे म्हणता येणार नाही; कारण असे गुन्हेगार व नक्षलवादी पकडलेही गेले आहेत, ही गोष्ट महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
नायजेरियनचा पर्वरी येथील रास्ता रोको प्रकरण आपल्या गोव्यातील कार्यकाळातील अत्यंत मोठी महत्त्वपूर्ण घटना आहे. त्या वेळी पोलीस खात्याचे ज्येष्ठ अधिकारी राज्याबाहेर होते आणि योगायोगाने आपणच सर्वात ज्येष्ठ अधिकारी होतो. स्थानिकांची गर्दी वाढल्यानंतर त्यांच्यापासून नायजेरियनना सुरक्षितपणे हलविणे ही जबाबदारी पोलीस खात्याची होती. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळण्यात आले.
व्यास यांची बदली दिल्ली येथे गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून झाली आहे. गोव्यातील गुप्तचर यंत्रणांच्या बाबतीत बोलताना मात्र त्यांनी अजून खूप सुधारणात वाव असल्याचे सांगितले. माहिती गोळा करण्याच्या विशिष्ठ प्रशिक्षणाला पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.
लोकमत परिवारातर्फे व्यास यांना ‘लोकमत’चे संपादक राजू नायक यांच्या हस्ते त्यांना मानपत्र भेट देण्यात आले. (प्रतिनिधी)

(बॉक्स)
राजकीय हस्तक्षेप नाही
पोलीस खाते हे नेहमीच राजकीय इशार्‍यावर काम करीत असल्याचे आरोप होत असतात. याविषयी व्यास यांना विचारले असता त्यांनी आतापर्यंत तर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप पाहिलेला नाही, असे सांगितले. राजकीय हस्तक्षेप होत आहे असे गृहीत धरून चालले तरी तो अत्यंत नगण्य असावा, असे ते म्हणाले. शेवटी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली किती पर्यंत झुकावे हे अधिकार्‍यावर अवलंबून असते.