भुवनेश्वर/हैदराबाद : ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा उष्णतेची लाट आली असून, या चार राज्यांत उष्माघाताने आतापर्यंत २५0हून अधिक लोक मरण पावले आहेत. ओडिशामध्ये उष्माघाताने मरण पावलेल्यांची संख्या ७९ झाली असून, मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारने ५0 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. आंध्र, तेलंगणा व छत्तीसगडमध्ये मिळून उष्माघाताने १३५हून अधिक बळी घेतले आहेत. - तितलागडमध्ये २६ एप्रिलपर्यंत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून, दुपारी ११ ते ४ या वेळेत लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चार राज्यांत उष्णतेची लाट, ओडिशामध्ये ७९ बळी
By admin | Updated: April 24, 2016 04:43 IST