शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारवादावर सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2015 00:07 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असतानाच गुरुवारी केजरीवाल सरकारही हा वाद घेऊन उच्च न्यायालयात पोहोचले.

नवी दिल्ली : अधिकार क्षेत्रावरून केंद्र आणि केजरीवाल सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असतानाच गुरुवारी केजरीवाल सरकारही हा वाद घेऊन उच्च न्यायालयात पोहोचले. केंद्र आणि केजरीवाल सरकार या दोन्हींच्या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने उद्याचा दिवस केंद्र आणि दिल्ली सरकारच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.अधिकार क्षेत्राच्या वाटणीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतील मुद्दे ‘संदिग्ध’ असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने २५ मे रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्याच दिवशी केजरीवाल सरकारने उच्च न्यायालयात धाव घेत, राजधानीत नोकरशहांच्या नियुक्तींसंदर्भात केंद्राच्या अधिसूचनेविरुद्ध याचिका दाखल केली. दिल्लीचे नायब राज्यपाल हे प्रशासकीय प्रमुख असल्याचे या अधिसूचनेत म्हटले होते.गत ५ मे रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी वरिष्ठ नोकरशहा शकुंतला गॅमलीन यांची दिल्लीच्या हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. यानंतर जंग आणि केजरीवाल सरकार यांच्या अधिकार क्षेत्रावरून संघर्ष सुरू झाला होता. दरम्यान, नजीब जंग यांनी गुरुवारी दिल्ली सरकारसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांची भेट घेतली. नायब राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात अधिसूचना विरोधातील ठराव विधानसभेने बुधवारी पारित केला. ४दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्या अधिकारासंदर्भातील अधिसूचनेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध केंद्रीय गृहमंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी तातडीने सुनावणी घेणार आहे. ४अतिरिक्त सॉलिसिटर जनरल महिंद्रा सिंह यांच्या वतीने केंद्राची याचिका न्या. ए. के. सिकरी आणि न्या. यू. यू. ललित यांच्या सुटीकालीन खंडपीठासमक्ष आणली गेली. ४उच्च न्यायालयाच्या टिपणीमुळे अनिश्चितता निर्माण झाली असून राजधानीत दैनंदिन प्रशासकीय कारभार चालवणे कठीण झाले आहे, त्यामुळे केंद्राच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, असे सिंह म्हणाले.४गत २५ मे रोजी दिल्ली पोलिसांच्या एक हेड कॉन्स्टेबलची जामीन याचिका खारीज करताना, दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेला (एसीबी) पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते. ४शिवाय अधिकार क्षेत्राच्या वाटणीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतील मुद्दे ‘संदिग्ध’ असल्याची टिपणीही केली होती. उच्च न्यायालयाच्या या टिपणीला गृहमंत्रालयाने आव्हान दिले आहे.