शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अशोक अढाव यांच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

हायकोर्ट : पुढील तारीख २१ ऑगस्ट

हायकोर्ट : पुढील तारीख २१ ऑगस्ट

नागपूर : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)वर प्रत्येक राज्यातून एक सदस्य निवडून पाठविला जातो. महाराष्ट्रासाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई येथील कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲन्ड सर्जन्सचे संचालक डॉ. गिरीश मैंदिरकर विजयी झाले आहेत. याविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी २१ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
डॉ. अढाव निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा करून केंद्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवांसमक्ष निवडणूक याचिका सादर केली आहे. या याचिकेची ३ महिन्यांपर्यंत दखल घेण्यात आली नाही. यामुळे अढाव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रलंबित निवडणूक याचिका तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी त्यांची विनंती आहे. एमसीआय राज्य सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. निवडणूक पोस्टल बॅलेटद्वारे होते. राज्यात ७८ हजारावर मतदार आहेत. निवडणुकीत अढाव यांना सुरुवातीपासूनच अडचणीत आणण्याचे प्रयत्न झालेत. अनुमोदक व सूचक यांच्या नावाखाली त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करण्यात आला नाही असे कारण नमूद करून अढाव यांचे नामनिर्देशनपत्र रद्द करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना निवडणूक लढवता आली. निवडणुकीत मैंदिरकर यांना १२ हजार तर, अढाव यांना ९३०० मते मिळाली आहेत. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.