शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी पूर्ण, उद्या निकाल

By admin | Updated: May 17, 2017 18:37 IST

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17 - कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय या प्रकरणी उद्या निकाल देणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी 3.30 मिनिटांनी न्यायालय याबाबत निकाल देणार आहे. भारताकडून ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी बाजू मांडली. 

दरम्यान, याप्रकरणी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापली बाजू मांडली असून या प्रकरणानिमित्त या न्यायालयात दोन्ही देश 18 वर्षांनंतर पुन्हा आमने-सामने आले आहेत. या आधी पाकिस्तानी नौदलाचे एक टेहळणी विमान भारताने कच्छच्या रणात पाडले, तेव्हा पाकिस्तानने 60 दशलक्ष डॉलर भरपाईसाठी या न्यायालयात दावा कला होता. तो 14 विरुद्ध 2 अशा बहुमताच्या निकालाने फेटाळला गेला होता. नेदरलँडमधील हेग येथे पीसपॅलेसच्या ग्रेट हॉल आॅफ जस्टिसमध्ये ही सुनावणी झाली. भारताने याबाबत 8 मे रोजी याचिका दाखल करत कुलभूषण जाधव यांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे. कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने 16  वेळा विनंती केली होती, पण परराष्ट्र नियमांचे उल्लंघन करत पाकिस्तानने मागणी फेटाळली असेही भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 10 ऑगस्ट 1999 रोजी भारताने कच्छच्या रणात पाकिस्तानी नौदलाचे एक टेहळणी विमान पाडले होते. यात नौदलाचे 14 जण मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी पाकिस्तानने 60 दशलक्ष डॉलर भरपाईसाठी या न्यायालयात दावा केला होता. 21 जून 2000 रोजी 16 न्यायाधीशांच्या पीठाने 14 विरुद्ध 2  अशा बहुमताने हा दावा फेटाळला होता.
 
‘आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणे विचारपूर्वक होते’ -
कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस-आयसीजे) मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी येथे म्हटले.
 
आयसीजेने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला मंगळवारी स्थगिती दिली. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी दाद का मागितली, असे वार्ताहरांनी विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले की, ‘भारताने जाधव यांची भेट घेण्यासाठी 16  वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यानुसार व्हिसा मान्य करण्यात आला आहे.’
 
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12  मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
 पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालवण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले.
 
 
 
  
पाकचा तोरा कायम; म्हणे योग्य पायरीवर उत्तर देऊ-
जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कोणत्याही प्रश्नाला ‘योग्य पातळीवर’ उत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी येथे म्हटले. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कायद्याची योग्य पद्धत अवलंबल्यानंतरच जाधव यांना लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांच्याबद्दल आयसीजेने पाकिस्तानला कोणतीही विनंती केली, तर आमचे सरकार योग्य पातळीवर त्याला प्रतिसाद देईल.’ जाधव यांच्या फाशीला आयसीजेने स्थगिती दिल्यानंतर लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यानंतर लष्कराने वरील वक्तव्य केले.
 
पाकिस्तानात भारत घडवून आणत असलेल्या दहशतवादावरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भारत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा वापर करीत आहे, असे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले होते. आयसीजेचा अधिकार पाकिस्तानवर नाही. आयसीजे संबंधित पक्षांच्या संमतीनंतरच विषय हाती घेऊ शकते, असे जीओ टीव्हीने म्हटले. ‘डॉन’ने ऑनलाईनवर आयसीजेकडे भारताचा अर्ज आल्याचे वृत्त दिले; परंतु फाशीला स्थगिती मिळाल्याचा भारताचा दावा वृत्तात दिलेला नाही. 
‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’नेही आपल्या बातमीत भारताने स्थगिती मिळाल्याच्या केलेल्या दाव्याचा उल्लेख केलेला नाही. भारताने आयसीजेने जाधव यांच्या फाशीला दिलेल्या स्थगितीवर मोकळा श्वास घेतला असला तरी भूतकाळ आणि पाकिस्तानसोबतचे ताणले गेलेले संबंध जाधव यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात अडथळा ठरू शकतात. भारताने पूर्वी दोन देशांतील वादात आयसीजेच्या अधिकाराबद्दल प्रश्न विचारला होता. पाकिस्तान आयसीजेचा आदेश स्वीकारील का? तांत्रिकदृष्ट्या तो त्याने स्वीकारला पाहिजे; परंतु भूतकाळाकडे पाहिले तर तसे होण्याची शक्यता नाही. राष्ट्रकुलातील दोन देशांचा संबंध असलेल्या प्रकरणात आयसीजेला अधिकार नाही, असा युक्तिवाद भारताने पाकिस्तानविरोधात करून ते प्रकरण जिंकले होते.