शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नापास विद्यार्थ्यांसमोर विद्यापीठाने टेकले हात!

By admin | Updated: June 24, 2016 00:13 IST

कोणी एक-दोन वेळा परीक्षेत नापास होऊ शकतो. मात्र, त्यानंतर तो पासच होतो. तथापि, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ८२ विद्यार्थ्यांची ‘बात’च वेगळी आहे

अहमदाबाद : कोणी एक-दोन वेळा परीक्षेत नापास होऊ शकतो. मात्र, त्यानंतर तो पासच होतो. तथापि, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ८२ विद्यार्थ्यांची ‘बात’च वेगळी आहे. त्यांनी परीक्षेत पास व्हायचे नाही, अशी जणू शपथच घेतली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने परीक्षा देत असूनही अभियांत्रिकी पदवी परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. यातील काहींची १२ वेळा, तर काहींची १५ वेळा परीक्षा देऊन झाली आहे.

त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी विद्यापीठाने नाही नाही ते प्रयत्न केले. वेबसाइटवर अपेक्षित प्रश्नसंच अपलोड केला. अगदी त्यांना नकला (कॉपी) करण्याचीही मुभा दिली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. सर्व उपाय करून थकल्यानंतर विद्यापीठाने आता याचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले आहे. या वेळी तुम्ही नापास झालात, तर पुढच्या वेळी परीक्षा देता येणार नाही. तुम्हाला पुन्हा नव्या सत्राला प्रवेश घ्यावा लागेल, अशी तंबीच विद्यापीठाने या स्टार परफॉर्मर विद्यार्थ्यांना दिली आहे.

या स्टार परफॉर्मर विद्यार्थ्यांची परीक्षा वारी विद्यापीठ परिसरात चेष्टेचा विषय बनली आहे. विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘२००७ मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ स्वत:च परीक्षा घेते. या ८२ स्टार परफॉर्मर विद्यार्थ्यांना सोडून आतापर्यंत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नोकरीही करीत आहेत. विद्यापीठ या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करण्यास आतूर आहे. मात्र, हे विद्यार्थी जागचे हलायला तयार नाहीत. आम्ही काय करू शकतो.’ या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरू आहे. यातील काही जणच परीक्षा देत असून, उर्वरित गैरहजर आहेत. परीक्षा तीन तासांची असताना हे विद्यार्थी एक ते दीड तासातच परीक्षा हॉलमधून बाहेर येतात. (वृत्तसंस्था)