शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मराठा आरक्षणावर १९ला सुनावणी

By admin | Updated: September 8, 2016 05:57 IST

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका निर्णयाअभावी प्रलंबित आहेत

नवी दिल्ली : मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका निर्णयाअभावी प्रलंबित आहेत, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद नारायणराव पाटील यांनी अ‍ॅड. संदीप देशमुख यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. न्या. ए. आर. दवे, आर. के. अगरवाल आणि एल. नागेश्वर राव यांच्या संयुक्त न्यायपीठाने या याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ जयंत भूषण यांनी सांगितले की, या प्रकरणी तातडीने सुनावणी होणे जरूरी आहे. कारण मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली आहे. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही अद्याप याप्रकरणी अंतिम सुनावणी निश्चित करून निर्णयही घेण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने अपील निकाली काढत उच्च न्यायालयाला या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मराठा समाज मागास आहे, या दाव्याच्या पुष्ट्यर्थ राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारी व तपशिलात त्रुटी असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.