शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांनी शाळेत सुरू केलं कुक्कुटपालन

By admin | Updated: June 15, 2017 14:41 IST

विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावं या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शाळेत सुट्टीच्या काळात कुक्कुटपालन होत असल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

रामपूर, दि. 15-  विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावं या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शाळेत सुट्टीच्या काळात कुक्कुटपालन होत असल्याची घटना समोर आली आहे.  दर्शनपूरमधील प्राथमिक शाळेत उन्हाळी सुट्टीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी रिकाम्या वर्गामध्ये कुक्कुटपालन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर त्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती कळल्याचं तिकडच्या मुलभूत शिक्षण अधिकारी सर्वा नंद यांनी सांगितलं आहे.  २१ मे पासून शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक फर्याद अली खान यांनी शाळेतील शिक्षक प्रयाग कुमार यांना घेऊन वर्गांमध्ये पोल्ट्री फार्म सुरू केल्याचं समजत आहे. इतकंच नव्हे तर शाळेच्या परिसरात इतर ग्रामस्थांचे पशुपक्षीही आढळून आले आहेत.  जिल्हा दंडाधिकारी शिव सहाय अवस्थी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही बाब समोर आली आहे. 
 
विशेष म्हणजे  हा संपूर्ण प्रकार गावातील महिला सरपंचाच्या पतीच्या सहमतीने केला, असं या प्रकरणातील दोषी शिक्षक प्रयाग कुमार यांनी सांगितलं आहे.  "उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यानंतर आम्ही शाळेला कुलूप लावून चाव्या ग्रामपंचांकडे दिल्या होत्या, जे स्वतः या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. शिक्षक म्हणून माझी ही पहिलीच पोस्टिंग असल्याने करिअरमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाईलाजाने मुख्याध्यापकांच्या या कामात सहभागी झालो होतो, अशी माहिती शिक्षक प्रयाग कुमार यांनी द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे. 
 
हा संपूर्ण प्रकार शिक्षण विभागासाठी लाजीरवाणा आहे, असं जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यापुढे असा कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाला जिल्ह्यातील सगळ्या शाळेच्या इमारती आणि परिसराची पाहणी करण्याचे आणि दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.