शिरोळमधील
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
शिरोळमधील पोलीस आऊटपोस्टला मंजुरी द्या
शिरोळमधील
शिरोळमधील पोलीस आऊटपोस्टला मंजुरी द्या* उल्हास पाटील यांचे गृहराज्यमंत्र्यांना निवेदनजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील पोलीस आऊटपोस्टचा प्रश्न प्रलंबित असून, कवठेगुलंद, दानोळी, दत्तवाड या ठिकाणी पोलीस आऊटपोस्ट मंजूर करावेत, अशी मागणी शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरोळ तालुक्यात पोलीस आऊटपोेस्टचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास कवठेगुलंद, दानोळी, दत्तवाड या ठिकाणच्या नागरिकांना अत्यंत सोयीचे होणार आहे. शिवाय पोलीस पदाच्या सहायक फौजदार, हवालदार, शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल, आदी जागाही रिक्त असून, त्या तत्काळ भरण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही होणे गरजेचे आहे, अशा आशयाचे निवेदन आ. पाटील यांनी नागपूर येथे गृहराज्यमंत्री शिंदे यांना दिले आहे. (प्रतिनिधी)