शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

"तो" चहावाला पाकिस्तानी नाही; जियो न्यूजचा दावा

By admin | Updated: July 13, 2017 11:21 IST

निळ्या डोळ्यांचा चहावाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13- काही महिन्यांपूर्वी निळे डोळे असणाऱ्या एका चहावाल्याने तरूणींना चांगलीच भूरळ घातली होती. सोशल मीडियावर त्या चहावालाच्या फोटोचीच चर्चा बघायला मिळाली होती. तोच निळ्या डोळ्यांचा चहावाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  पाकिस्तानमधल्या फोटोग्राफर जिया अली या तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहावाल्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्या तरूणाचे निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला चहावाला बराच लोकप्रिय झाला होता. तसंच त्याच्या लूकमुळे त्याला मॉडेलिंगच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या. त्या तरूणाचं अर्शद खान असं नाव असून तो पाकिस्तानच्या इतवार बाजारात चहा विकत होता. पण आता पाकिस्तानी मीडियाने त्या चहावाल्याचं सत्य बाहेर आणल्याचा दावा केला आहे. अर्शद खान हा मुळचा पाकिस्तानी नाही, असा दावा पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने केला आहे. अर्शद हा मूळचा अफगाणिस्तानचा असल्याचंही बोललं जातं आहे. 
 
जियो न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीला ‘द नॅशनल डाटाबेस अँड रजिस्ट्रेशन ऑथॅरिटीने’ने दिलेल्या माहितीनुसार अर्थद खान मूळचा पाकिस्तानचा नसून अफगाणिस्तानचा आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. तसंच पाकिस्तानमध्ये राहण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं त्याच्याकडे नाहीत, तो बेकायदेशीरपणे तिथे राहतो असंही त्यांनी म्हटलं आहे. या वृत्ताला अफगाणिस्तानच्या दूतावातील अधिकारी डॉक्टर ओमर झाकीलवाल यांनीही दुजोरा दिला आहे. तो पाकिस्तानचा नसून मुळचा अफगाणिस्तानचा आहे असं ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. अर्शदने पाकिस्तानी पासपोर्टसाठीही अर्ज केल्याचं समजत आहे. आपल्या प्रसिद्धीचा वापर करून त्याने खोटी कागदपत्र सादर केली असल्याचंही वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. 
आणखी वाचा
 

पनामागेट प्रकरण : नवाज शरीफांची खुर्ची गेल्यास यांच्याकडे पंतप्रधानपद?

छोट्या युद्धांसाठी केंद्राची तयारी, लष्कराला आर्थिक निर्णय घेण्याचा हक्क

गँगस्टरच्या एन्काऊंटरनंतर संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ

दरम्यान, अर्शदला जियो न्यूजने याबद्दलची विचारणा केल्यावर त्याने मूळचा अफगाणिस्तानचा असल्याची माहिती पूर्णपणे फेटाळून लावली. तसंच त्याच्या वडिलांचा पाकिस्तानी पंजाबमध्ये जन्म झाल्याचं त्याने सांगितलं. पण अर्शदकडे त्याने केलेला दावा खरं करून दाखविण्यासाठी कोणतीही कागदपत्र नव्हती.  

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या चहावाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तरूणींना घायाळ करणाऱ्या या चहावाल्याला अनेकांनी मॉडेलिंगच्या ऑफर्सही दिल्या होत्या.