हॉकर्स पुन्हा खाऊगल्लीत आयुक्तांकडून पाहणी : गाड्या लागल्यास जप्त करण्याचे आदेश
By admin | Updated: February 24, 2016 00:41 IST
जळगाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत होत्या. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी स्वत: या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच या गाड्या लागल्यास जप्त करण्याचे आदेश दिले.
हॉकर्स पुन्हा खाऊगल्लीत आयुक्तांकडून पाहणी : गाड्या लागल्यास जप्त करण्याचे आदेश
जळगाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत होत्या. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी स्वत: या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच या गाड्या लागल्यास जप्त करण्याचे आदेश दिले. मनपाच्या प्रवेशद्वारालगत शिवसेनाभवनकडे जाणार्या बोळीत जनरेटरजवळ चार हातगाड्या लावण्याचा विषय नगरसेवक कैलास सोनवणे यांनी महासभेत मांडला होता. त्यावर सभेत चर्चाही झाली. मात्र ठराव मंजूर झालेला नव्हता. असे असतानाही त्याच दिवसापासून या ठिकाणी चार गाड्या उभ्या राहणे सुरू झाले. नगरसेवकाने यात रस घेतल्याने मनपा प्रशासन त्याकडे दूर्लक्ष करीत होते. मात्र त्यामुळे रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरीत झालेल्या हॉकर्सच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत सोमवारी पुन्हा रस्त्यावर गाड्या लावल्या होत्या. त्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच मंगळवारी आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरीत या चार गाड्या त्या ठिकाणी लागल्यास जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच रस्त्यावर खाऊगल्लीतील गाड्या लागल्या तर त्या देखील जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच स्वत:रात्री १० वाजता पुन्हा येऊन पाहणी करणार असल्याचे बजावले. त्यामुळे मंगळवारी अतिक्रमण विभागचे पथक सायंकाळपासून तैनात करण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावर हॉकर्सच्या गाड्या न लागता खाऊगल्लीत लागल्या.