शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

थोडा संयम बाळगा, चीनने भारताला दिला इशारा

By admin | Updated: May 30, 2017 10:12 IST

भारताने आसाम आणि अरुणाचल प्रदेश या देशातील दोन राज्यांना जोडणारा पूल उभारल्यानंतर चीनने लगेच विरोध केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - भारताने आसाम आणि अरुणाचल प्रदेश या देशातील दोन राज्यांना जोडणारा पूल उभारल्यानंतर चीनने लगेच विरोध केला आहे. अरुणाचलमध्ये बांधकाम करताना भारताने सावधता आणि आत्मसंयम बाळगावा असे चीनने म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. पण भारताने नेहमीच चीनचा हा दावा खोडून काढताना अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याचे चीनला निक्षून सांगितले आहे. 
 
भारत आणि चीनमध्ये सीमावाद अजून मिटलेला नाही. तो पर्यंत सीमावर्ती भागात शांतत राखण्यासाठी भारताने आत्मसंयमाची भूमिका घ्यावी असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयएएनएस वृत्तसंस्थेला म्हटले आहे. सरकारच्या तिस-या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मागच्या आठवडयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील लोहित नदीवर बांधण्यात आलेला देशातील सर्वांत लांब पूल (९.१५ किलोमीटर)  राष्ट्राला अर्पण केला. या पुलामुळे १६५ किलोमीटरचे अंतर घटले असून, ७ ते ८ तासांचा प्रवासही वाचला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाची दारे उघडली जातील.  
 
वांद्रे-वरळी सी लिंक पुलापेक्षा हा पूल ३.५५ किलोमीटरने लांब असून, पुलासाठी २,०५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. लोहित नदीवरील पुलामुळे नव्या आर्थिक क्रांतीचा पाया घातला जाईल व आर्थिक महासत्ता बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. या पूलामुळे दिवसाला 10 लाख रुपयांचं इंधन वाचेल असा दावा सरकार करतं आहे. चीन सीमेवर तातडीनं हालचाली करण्यासाठी, अवजड टँक आणि इतर शस्रांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी हा पूल फायद्याचा ठरणार आहे. 
 
या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी तुकडीला आसामच्या ढोलामधून अरुणाचलला जायचं असलं की नौकेतून प्रवास करण्यासाठी तासनतास घालवावे लागत. सोबत अवजड वाहन असल्यास 250 किमी वळसा घालत 10 तासांचा प्रवास करावा लागायचा. पण या पूलामुळे पूर्वोत्तर सीमेवर लष्कराला अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे. 
 
पुलाची वैशिष्ट्यं
- ढोला-सदिया ब्रम्हपुत्र पुलाची लांबी 9.15 किलोमीटर आहे.
- ब्रम्हपुत्र पुल वांद्रे-वरळी सी-लिंकपेक्षा 30 टक्के मोठा आहे.
- आसामची राजधानी दिसपुरपासून 540 किमी आणि अरूणाचलची राजधानी ईटानगरपासून 300 किमी लांब आहे.
- महत्त्वाचं म्हणजे चीनचं एरियल डिस्टंस 100 किमीपेक्षा कमी आहे.
- तेजपुर जवळ असलेल्या कलाईभोमोरा पुल नंतर ब्रम्हपुत्रवर पुढच्या 375 किमी ढोलापर्यंत दूसरा पुल नाही आहे.
- आत्तापर्यंत नदीच्या मार्गाने प्रवास करण्यासाठी होडीचा वापर करावा लागत होता. 
- ब्रम्हपुत्र पुल बनवायचं काम 2011मध्ये सुरू झालं होतं, तर पुलासाठी एकुण 950 करोड खर्च झाला आहे.
- एकुण 182 खाबांवर हा पुल उभा आहे.
- आसाम आणि अरूणाचल या दोन राज्यांना हा पूल जोडेल.
- लोकांना प्रवास करण्यासाठी तसंच लष्कराला या पुलाचा खूप फायदा होणार आहे.
- चीन सीमेपर्यंत प्रवास करण्यासाठी चार तासांचं अंतर कमी होणार आहे.