शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

'त्या' हत्तिणीची होणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

By admin | Updated: July 27, 2016 19:37 IST

गेल्या काही दिवसांपासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेकांची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमततिरुअनंतपूरम, दि. 27 - गेल्या काही दिवसांपासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेकांची नोंद झाली आहे. मात्र आता एक वयोवृद्ध हत्तीण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपूरममध्ये दक्षायणी नावाची 86 वर्षांची हत्तीण आहे. ती जगातील सर्वात जास्त आयुष्य जगणारी हत्तीण ठरणार आहे.

2003मध्ये 85 वर्षांचा हत्ती चीनमधल्या तैवानमध्ये मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर जगात सर्वाधिक जगणारी दक्षायणी हत्तीण असल्याची माहिती त्रावणकोर देवस्सम बोर्डनं दिली आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या माहितीनुसार ही हत्तीण त्रावणकोर देवस्सम बोर्डाच्या मालकीची आहे. या देवस्थानाकडे असणारी हत्तीण ही जगातील सगळ्यात वृद्ध हत्तीण असल्याचा दावा या बोर्डाने केला आहे. त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी, यासाठी या बोर्डाने पुढाकार घेतला आहे.

त्रावणकोरच्या राजघराण्याने या संस्थेला ही हत्तीण बहाल केली होती. केरळच्या अनेक सण आणि धार्मिक कार्यांमध्ये या हत्तिणीला महत्त्वाचे स्थान आहे. सध्या या देवस्थानाकडे ३३ हत्ती आहेत. त्यापैकी दक्षयाणी ही सगळ्यात वृद्ध हत्तीण आहे. त्यामुळे तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घ्यावी, अशी आशा त्रावणकोर देवस्सम बोर्डनं व्यक्त केली आहे.