शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी लशीवर प्रश्नचिन्ह: ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, कंपनीनं दिलं असं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 14:42 IST

विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

ठळक मुद्देविज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते.कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, स्वतः विज यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर चर्चेला सुरुवात होताच, कंपनीकडून स्पष्टिकरण देण्यात आले आहे.

चंदीगढ - कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

दोन डोसनंतरच लस प्रभावी, भारत बायोटेकचे स्पष्टिकरण -लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर चर्चेला सुरुवात होताच, कंपनीकडून स्पष्टिकरण देण्यात आले आहे. यासंदर्भात भारत बायोटेकने एक निवेदन जारी केले आहे. यात, कोव्हॅक्सिनच्या 2 ट्रायलचे शेड्यूल आहे. दोन डोस 28 दिवसांत द्यायचे आहेत. दुसरा डोस 14 दिवसांनंतर द्यायचा आहे. यानंतरच याची एफिकेसी समजेल. दोन डोस दिल्यानंतरच ही लस (कोव्हॅक्सिन) प्रभाव दाखवेल, अशा पद्धतीनेच तिची निर्मिती करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, स्वतः विज यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. "मी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करून घ्यावी," असे विज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोसहरियाणामध्ये 20 नोव्हेंबर रोजी 'कोवॅक्सीन' या कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. 20 नोव्हेंबर रोजी विज यांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. विज यांच्यासोबत 200 जणांना कोव्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या 'कोव्हॅक्सीन' या लशीची निर्मिती केली जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरHaryanaहरयाणा