शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हरिहरनगरात देहव्यापाराचा अड्डा

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

हरिहरनगरात देहव्यापाराचा अड्डा

हरिहरनगरात देहव्यापाराचा अड्डा
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी धाड टाकून हरिहरनगर येथील पॉश परिसरात सुरू असलेला देहव्यापाराचा अड्डा उघडकीस आणला.
सोनेगाव हद्दीतील हरिहरनगर शांती हाईट बी विंगच्या सहाव्या माळ्यावरील फ्लॅट नंबर ६०६ येथे प्रमिला नावाची महिला व फिरोज खान नावाचा इसम हे दोघे देहव्यापाराचा अड्डा चालवीत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सोमवारी सापळा रचला. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त एस.के. तरवडे, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.एम. पोवार, योगेश चौधरी, पोलीस हवालदार पांडुरंग निकुरे, प्रकाश सिडाम, संजय पांडे, योगेश घोडकी, प्रफुल बोंदरे, अस्मिता मेश्राम, अनिता धुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या पवार यांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी आरोपी प्रमिला कोहोड (४८) रा. गोळीबार चौक व फिरोज खान वल्द तुर्रेबाज खान (४३) रा. श्रावणनगर वाठोडा लेआऊट यांना अटक केली. हे दोघेेही मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते. यावेळी त्यांच्या तावडीतून दोन मुलींची सुटका करण्यात आली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.