शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण ५० विद्यार्थी शाळेतून पळाले

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण
५० विद्यार्थी शाळेतून पळाले
शेखपुरा : कॉलेजचे विद्यार्थी सतत रॅगिंग करीत असल्याने येथील नवोदय विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री शाळेतून धूम ठोकली. पळालेले सर्व विद्यार्थी आठवीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
जिल्हाधिकारी प्रणवकुमार यांनी शनिवारी सांगितले की, अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होत असल्याने हे विद्यार्थी जेरीस आले होते. तक्रारीनंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या भोजनानंतर हे विद्यार्थी वसतिगृहातून पळून गेले. शनिवारी सकाळच्या प्रार्थनेला आठवीचे विद्यार्थी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर प्राचार्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा ते पळून गेल्याचे समोर आले. विद्यालयातून रात्री पळून गेलेले विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानी गोळा झाले. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकार्‍यांनी प्राचार्यांना पाचारण करीत या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलविण्यास सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठविण्यात आले व पुन्हा असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याची सक्त ताकीद प्राचार्यांना देण्यात आली. शेखपुरा नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात ५०० विद्यार्थी राहतात. विद्यार्थी शाळेतून गायब झाल्यामुळे प्रशासन हादरून गेले होते.