ेउपळवटे येथे हरिनाम सप्ताह
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
कुर्डूवाडी : अधिक मासानिमित्त उपळवटे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. यावेळी ह.भ.प.गोसावी महाराज दहिवली, ह.भ.प.शेळके महाराज उपळवटे, ह.भ.प.पंडित महाराज अकुलगावकर, ह.भ.प.नाईक ननवरे महाराज क्षेटफळ, ह.भ.प.सुधाकर लोकरे लऊळ, ह.भ.प.शिंदे महाराज निमगाव टे यांची कीर्तने तर काल्याचे कीर्तन ह.भ.प.मुकुंद महाराज तरंगे चिंचगाव टेकडी यांचे झाले.
ेउपळवटे येथे हरिनाम सप्ताह
कुर्डूवाडी : अधिक मासानिमित्त उपळवटे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. यावेळी ह.भ.प.गोसावी महाराज दहिवली, ह.भ.प.शेळके महाराज उपळवटे, ह.भ.प.पंडित महाराज अकुलगावकर, ह.भ.प.नाईक ननवरे महाराज क्षेटफळ, ह.भ.प.सुधाकर लोकरे लऊळ, ह.भ.प.शिंदे महाराज निमगाव टे यांची कीर्तने तर काल्याचे कीर्तन ह.भ.प.मुकुंद महाराज तरंगे चिंचगाव टेकडी यांचे झाले.या सप्ताहामुळे उपळवटे येथे सात दिवस धार्मिक वातावरण होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पाटील, दिलीप खुपसे, मारुती मुरुमकर, नागन्नाथ देवडकर, दत्तात्रय घाडगे, हनुमंत खुपसे, शशीकांत खुपसे यांच्यासह उपळवटे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.