शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

तिरंग्याच्या अपमानाबद्दल हार्दिक पटेल यांना अटक

By admin | Updated: October 20, 2015 04:02 IST

गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडणारे नेते हार्दिक पटेल यांना सोमवारी तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल देशद्रोहाच्या कठोर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

सुरत/ राजकोट : गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडणारे नेते हार्दिक पटेल यांना सोमवारी तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल देशद्रोहाच्या कठोर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापेक्षा पोलिसांना ठार मारा अशी चिथावणीजनक वक्तव्ये केल्याबद्दलही त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.भारत-दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय क्रिकेट सामना उधळण्याची धमकी दिल्याबद्दल राजकोट येथे रविवारी हा सामना सुरू होण्यापूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी गाडीच्या टपावर चढून तिरंगा हाती घेत तो चुरगळल्याचे व्हिडिओ फुटेजवरून स्पष्ट दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी पढ्ढारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक केल्याचे राजकोटचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) गगनदीप गंभीर यांनी सांगितले. ३ आॅक्टोबर रोजी हार्दिक पटेल यांनी पोलिसांना ठार मारण्याची चिथावणी युवा कार्यकर्त्यांना दिली होती. त्याबद्दलही त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जन्मठेपेची तरतूदपटेल यांच्याविरुद्ध सुरतमधील अमरोली पोलीस ठाण्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली कलम १२४ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबद्दल दोषी आढळल्यास अधिकाधिक जन्मठेप, तर किमान तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. (वृत्तसंस्था)लेखी किंवा मौखिकरीत्या द्वेषपूर्ण शब्दांचा वापर, सरकारबद्दल अनादर दाखविणारे कृत्य करणे यासारख्या गुन्ह्यांसाठी ही शिक्षा ठोठावली जाते. कलम ११५ (गुन्ह्यांसाठी चिथावणी), १५३-ए (विविध गटांमध्ये वैमनस्याला प्रोत्साहन) ५५५-२ (दोन समुदायांना परस्परांविरुद्ध भडकविणे), ५०६ (धमक्या देणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हार्दिक यांनी पढ्ढारी येथील स्थानिक न्यायालयातून जामीन मिळविल्यास त्यांना राष्ट्रध्वजाच्या अपमानाबद्दल राजकोट येथे अटक केली जाईल, असे सुरतचे शहर पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.