शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पटेलला अटक व सुटका, पोलिसांचा लाठीमार.....

By admin | Updated: August 25, 2015 22:23 IST

गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे म्हणून आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या २२ वर्षीय हार्दिक पटेलला अहमदाबाद पोलिसांनी अटक केले आणि काहीवेळानंतर

 ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २५ -  गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे म्हणून आंदोलनाचे नेतृत्त्व  करणाऱ्या २२ वर्षीय हार्दिक पटेलला अहमदाबाद पोलिसांनी अटक केले आणि काहीवेळानंतर त्याची सुटका केली.
पटेल समाजाला ओबीसीमध्ये सहभागी करून आरक्षण द्यावे यासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच परवानगी देण्यात असल्याचे सांगत पोलिसांनी हार्दिक पटेलला अटक केली. या महारॅलीत लाखो लोक सहभागी झाले होते. या महारॅलीत काही ठिकाणी हिंसक वळण आल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाकडून अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री आणि मोदींचे विरोधक नितीश कुमार यांनी हार्दिक पटेलच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. 
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून २२ वर्षीय हार्दिक पटेल या समाजाचे नेतृत्व करत आहे. अहमदाबाद येथे पटेल समाजाच्या आरक्षणासाठी महारॅलीचे आयोजन करुन हार्दिक पटेलने गुजरातमधील भाजपा सरकारला इशाराच दिला आहे. गेल्या  १० वर्षात गुजरातमध्ये सहा हजार शेतक-यांनी आत्महत्या केली आता आत्महत्या झाली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही पटेल यांनी म्हटले आहे. देशातील तरुण आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मागत असेल व त्याला त्याचे हक्क मिळत नसतील तर त्यातूनच नक्षलवाद जन्माला येतो असेही पटेल यांनी नमूद केले.  गुजरातमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असून गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच भाजपाविरोधात एवढे मोठे आंदोलन होत आहे.