शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

हर... हर... महादेवच्या जयघोषाने नवी मुंबई दुमदुमली

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नवी मुंबई : हर... हर... महादेव..., बम बम भोले..., ओम नम: शिवायच्या जयघोषात भक्तांनी शिवमंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : हर... हर... महादेव..., बम बम भोले..., ओम नम: शिवायच्या जयघोषात भक्तांनी शिवमंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबईत सर्व शिवमंदिरांमध्ये आज पहाटे ४ वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. पंचामृतांनी अभिषेक करण्यात आला. भक्तांनी बेल, पांढर्‍या रंगाची फुले वाहून पूजा केली. मंदिरामध्ये हरिपाठ, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमुळे सर्व नवी मुंबई परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला होता. शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
वाशी येथील पुरातन जागृतेश्वर मंदिरामध्ये संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठाचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. सानपाडा येथील दत्तमंदिरातील शिवमंदिरामध्येही हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम पार पडला. पावणे येथील पावणेश्वर शिवमंदिरामध्ये हरिभक्तांच्यावतीने कीर्तन, हरिपाठ व भजन करण्यात आले. त्याचबरोबर एमजीएम कॉलनीतील शिवमंदिर, पामबीच येथील बुद्धेश्वर शिवमंदिर, महापे-एमआयडीसीमधील बावखळेश्वर शिवमंदिर, कोपरखैरणे येथील चिकणेश्वर शिवमंदिर, बेलापूर गावातील शिवमंदिर, घणसोली गावातील शिवमंदिर, नेरूळ गावातील सेक्टर-१६-१८ तलावाजवळील शिवमंदिर, खारघर सेक्टर-१२ येथील शिवमंदिर व खांदेश्वर येथील शिवमंदिरात पहाटेपासून रुद्राभिषेक, महाआरती, शिवपूजा करण्यात आली. (प्रतिनिधी)

चौकट
शिवभक्तांसाठी महाप्रसाद
पहाटे ४ वाजल्यापासून दर्शनासाठी येणार्‍या भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिराच्या परिसरामध्ये मंडप उभारण्यात आला होता. आसन व्यवस्था आणि रांगा तयार केल्या होत्या. सर्व शिवमंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले होते, त्याचबरोबर अनेक शिवभक्त, समाजसेवक आणि राजकीय पक्षांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त अन्नदान, फराळाचे वाटप करण्यात आले. शिवाचे नामस्मरण करणार्‍या भक्तांसाठी खास आसन व्यवस्था मंदिर परिसरामध्ये करण्यात आली होती.

फोटो आहेत- महाशिवरात्री