शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?; राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 10:43 IST

तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे.

मुंबई - १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. सरकारनेही स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारनं हर घर तिरंगा अभियान(Har Ghar Tiranga) हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक स्वातंत्र्य देशाचा स्वत:चा राष्ट्रीय ध्वज असतो. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. 

'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?

तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे, पण एक काळ असा होता की प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता, असे अनेक बदल घडले, ज्यानंतर सामान्य माणूस घर, कार्यालय, शाळांमध्ये तिरंगा फडकवू शकतो. 

२००२ मध्ये ध्वज संहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला. आज जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीत आम्ही तिरंग्याच्या ध्वज संहितेतील तरतुदींबद्दल सांगत आहोत. भारतीय ध्वज संहितेच्या कलम २.१ नुसार, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक, खाजगी किंवा शैक्षणिक संस्थेत तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, तिरंगा फडकवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण १९७१ च्या Prevention Of Insults To National Honour Act कायद्यांतर्गत काही नियम आहेत जे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.

तिरंगा फडकवण्याचे काय नियम आहेत?

  • तिरंगा फडकवताना तिरंग्याचा आदर सर्वोतोपरी असला पाहिजे हे ध्यानात ठेवावे. कधीही गलिच्छ किंवा फाटलेला झेंडा फडकवू नका.
  • तिरंगा कधीही उलटा फडकवू नये. जेव्हा तुम्ही तिरंगा फडकावता तेव्हा वरच्या बाजूला भगवा रंग दिसला पाहिजे. ध्वज कुणापुढे झुकता कामा नये. तसेच तिरंग्याभोवती इतर कोणताही ध्वज त्याच्यापेक्षा उंच नसावा किंवा त्याच्या बरोबरीचा असू नये. तिरंग्याच्या खांबावर इतर काहीही ठेवू नका. यामध्ये फुलांच्या हार आणि चिन्हाचा समावेश आहे. 
  • तिरंगा फडकवताना तो जमिनीवर किंवा पाण्यात नसावा. तिरंग्याचा वापर ड्रेस म्हणून करू नये. तुम्ही तुमच्या रुमाल, उशी किंवा अशा कोणत्याही वस्तूवर तिरंगा वापरू शकत नाही. तसेच तिरंग्यावर काहीही लिहिता येणार नाही. 
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNational Flagराष्ट्रध्वज