शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या चड्डीतील वधूमुळे सोशल मीडियावर खळबळ

By admin | Updated: June 6, 2017 20:25 IST

भारतीय लग्न पद्धती बदलली असली तरी त्यातील देखावा कमी झालेला नाही. भारतीय लग्न म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ?

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. ... लग्न कसं ठरवायचं यामध्ये बदल झालेत, पण लग्नसोहळा पारंपरिक हवा म्हणणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी आहे. लग्न म्हणजे प्रत्येकाला देवानं दिलेलं अमूल्य बक्षीस. लग्न म्हणजे सुंदर स्वप्न अशा प्रकराच्या काव्यत्मक पंक्ती कितीतर आहेत. भारतीय लग्न पद्धती बदलली असली तरी त्यातील देखावा कमी झालेला नाही. भारतीय लग्न म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ? लग्नघर, रोषणाई, नाचणारे वऱ्हाडी आणि वाजंत्री, सुग्रास जेवण डोळ्यासमोर येतं. पण या लग्नांचे प्रमुख आकर्षण असतं ते लाजरी -बुजरी, नटलेली आणि हळदीच्या रंगात रंगलेली नवरी. नवरीचा पोशाख नेहमीच चर्चेत असतो. तिनं काय घातलंय याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण अशीच नवरी जर शॉर्टस् घालून आली तर?हा पराक्रम केलाय एका पंजाबी नवरीने. ही नवरी छान नटलीय. घुंघटही तिनं घेतलाय. पण लेहेंगा घालण्याचं सोडून ही चक्क शॉर्टस घालून आली. सध्या तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचे दिसते आहे. नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नवरी- लाल चोळीने सजली होती, भरजरी दागिन्यांनी नटली होती, लग्नाला शोभेल असा मेक-अपही तिने केला होता. फक्त लेहेंग्याच्या जागी शॉर्टस घालून ती नवऱ्यासोबत हातात हात घालून चालत होती.परंपरा आणि आधुनिकतेचे परफेक्ट कॉम्बिनेशन असणाऱ्या या नवरीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवलीय. लग्नासाठी नट्टा-पट्टा सगळ्याच नवऱ्या करतात पण शॉर्टस घालणारी ही नवरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.