शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सालेमला फाशी द्या - सरकार पक्ष

By admin | Updated: February 18, 2015 00:59 IST

सालेमला फाशी द्या

सालेमला फाशी द्या
सरकारी पक्षाची मागणी : पोर्तुगालशी केलेला करार भंग होईल
मुंबई : प्रदीप जैन खूनप्रकरणी गँगस्टर अबू सालेम व मेहंदी हसन या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाने विशेष टाडा न्यायालयात मंगळवारी केली़
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही मागणी केली़ ते म्हणाले, हा खून क्रूर पद्धतीने केलेला नाही़ पण हा खून केल्यानंतर सालेमला याचा पश्चात्ताप झाला नव्हता़ उलट त्याने जैन यांच्या पत्नीला बोलावून खंडणीची उर्वरित रक्कम देण्यासाठी धमकावले़ तसेच खंडणी न दिल्यास जैन कुटुंब संपवून टाकेन, असाही दम सालेमने जैन यांच्या पत्नीला दिला होता़ त्याचे हे कृत्य तालिबानी अतिरेकी वृत्तीचे आहे़ त्याला संपूर्ण जैन कुटुंब संपवायचे होते़ तेव्हा त्याला केवळ जन्मठेपेची शिक्षा दिल्यास तो समाजासाठी अधिक घातक ठरेल़ त्यामुळे सालेमला फाशीचीच शिक्षा ठोठवावी, अशी मागणी ॲड़ निकम यांनी केली़
तसेच हसन याने या खुनात महत्त्चाची भूमिका बजावली असल्याने तोही फाशीस पात्र आहे़ मात्र यातील तिसरे आरोपी वीरेंद्रकुमार यांचा या घटनेत महत्त्वपूर्ण सहभाग नव्हता़ ते आता ८६ वर्षांचे आहेत़ त्यामुळे वीरेंद्रकुमार यांना सात वर्षांची शिक्षा ठोठवावी, अशी विनंती ॲड़निकम यांनी न्यायालयाला केली़
याला सालेमचे वकील सुदीप पासबोला यांनी विरोध केला़ ते म्हणाले, सालेमला कठोर शिक्षा ठोठावली जाणार नाही, या अटीवरच भारताने सालेमचा ताबा पोर्तुगालकडून घेतला आहे़ असे असताना त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी करणे योग्य नाही़ जगभरात याने भारताबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो़ त्यातही जैन यांचा खून ही घटना विरळातील विरळ नसल्याचा निर्वाळा खुद्द सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़ तेव्हा सालेमला फाशी देणे योग्य ठरणार नाही, असा दावा ॲड़ पासबोला यांनी केला़ हा युक्तिवाद बुधवारीही सुरू राहणार आहे़
जुहू येथील बंगल्याबाहेर जैन यांची १९९५मध्ये गोळ्या झाडून हत्या झाली़ यासाठी विशेष टाडा न्यायालयाने सालेमसह हसन व वीरेंद्रकुमार यांना दोषी धरले आहे़ त्यांना किती शिक्षा ठोठवावी याबाबत सध्या सरकारी व बचाव पक्ष युक्तिवाद करीत आहेत. (प्रतिनिधी)