शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये आता फुल प्लेटऐवजी मिळणार हाफ प्लेट ?

By admin | Updated: April 12, 2017 08:42 IST

अन्नाची होणारी ही नासाडी टाळण्यासाठी आता केंद्र सरकार हॉटेलमध्ये फुल प्लेटच्या ऐवजी कोणतीही डिश हाफ प्लेटमध्ये देता येईल का, यावर विचार करत आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - ब-याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणतीही डिश फुल प्लेट घ्यावी लागते. एका व्यक्तीला ही फुल प्लेट डिश संपवणं जिवावर येतं. त्यामुळे उरलेलं अन्न टाकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही. मात्र अन्नाची होणारी ही नासाडी टाळण्यासाठी आता केंद्र सरकार हॉटेलमध्ये फुल प्लेटच्या ऐवजी कोणतीही डिश हाफ प्लेटमध्ये देता येईल का, यावर विचार करत आहे. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना ग्राहकांना एका प्लेटमध्ये किती प्रमाणात अन्न मिळणार आहे, हेही आता हॉटेलमालकांना स्पष्ट करावं लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना यासंबंधी एक ताकीदच दिली आहे. हॉटेल मालक फुल प्लेटच्या डिशसोबतच हाफ प्लेट डिश देण्याची व्यवस्था करणार नसल्यास आम्ही यासाठी कायदेशीर तरतूर करण्याच्या तयारीत असल्याचं राम विलास पासवान म्हणाले आहेत. वैयक्तिक अनुभवांतून ही कल्पना आली आहे. जेव्हा आपण बाहेर खायला जातो, तेव्हा अन्नाची प्रचंड नासाडी होताना पाहतो. दुसरीकडे देशात असेही काही नागरिक आहेत, ज्यांना खायला अन्न मिळत नाही, असं पासवान यांनी सांगितलं आहे. देशात प्रमाणाच्या बाहेर अन्नाची नासाडी होत असते, गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून अन्नाच्या होणा-या नासाडीवर चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी ताटात गरजेपुरतं अन्न घ्या आणि घेतलेल्या अन्नाची नासाडी करू नका, असा सल्ला दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर राम विलास पासवान यांनी हे मत व्यक्त केल्याचं बोललं जातंय. हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सनी किती अन्न सर्व्ह करावं, याबाबत सरकार कोणतीही नियमावली करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र तुम्ही एका प्लेटमध्ये किती चपात्या, किंवा इडल्या किंवा चिकनचे पिस देणार, याचा उल्लेख करा, अशी अपेक्षा हॉटेल्सकडून पासवान यांनी व्यक्त केली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आता फुल प्लेट भाजी घेणं बंधनकारक नसल्याचे सूतोवाच पासवान यांनी केले होते. हाफ किंवा पाव प्लेट भाजी देण्याबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयानं एक मसुदा तयार केला असून, त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. सध्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी हाफ प्लेट भाजी देत नसल्यानं नाइलाजास्तव फुल प्लेट भाजी घ्यावी लागते. एका व्यक्तीला एवढी भाजी संपवणं अवघड जातं. तसेच तुम्हाला फुल प्लेटचे पैसेही मोजावे लागतात, याच पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयानं हे पाऊल उचलणार असल्याचं बोललं जात आहे.