शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

अर्ध्या रोखीवरच चालतोय देश

By admin | Updated: January 13, 2017 00:41 IST

नोटाबंदीच्या काळात ५00 आणि १000 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा बँकांत जमा झाल्यामुळे देशाचा आर्थिक व्यवहार केवळ

मुंबई : नोटाबंदीच्या काळात ५00 आणि १000 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा बँकांत जमा झाल्यामुळे देशाचा आर्थिक व्यवहार केवळ अर्ध्या रोख रकमेवरच सुरू आहे. म्हणजेच बाद करण्यात आलेल्या नोटांपैकी ६0 टक्के नोटा अजून रिझर्व्ह बँकेला चलनात आणायच्या आहेत. त्या चलनात कधी येणार, हा प्रश्न असून, त्या येईपर्यंत चलनतुटवडा भासणार, हे उघड आहे. अर्थात नोटाबंदीपूर्वी जितके चलन देशात वापरात होते, तितके पुन्हा आणले जाणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मध्यंतरी म्हणाले होते. लोकांनी अधिकाधिक कॅशलेस, डिजिटल व्यवहार करावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे. ते वाढले तर नोटाबंदीपूर्वी होते, तितके चलन छापण्याची वेळ येणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र कॅशलेस वा डिजिटल व्यवहारांना आतापर्यंत प्रचंड म्हणावा, असा प्रतिसाद मिळालेला नाही. स्टेट बँकेच्या चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांच्या मते बँकांकडे पुरेसे चलन येण्यास आणि लोकांना ते पुरेशा प्रमाणात देण्यास फेब्रुवारी उजाडेल. पण काहींच्या मते आणखी दोन महिने चलनतुटवडा भासण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे तेथे आणि ग्रामीण भागांत पुरेशा प्रमाणात चलनपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नोटाबंदीची मुदत संपल्यानंतरही देशाच्या चलनात ८.९६ लाख कोटी रुपयांच्याच नोटा आहेत. नोटाबंदीच्या आधी ४ नोव्हेंबर रोजी १७.९७ लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या. याचाच अर्थ सध्या चलनात असलेल्या नोटांचे प्रमाण आधीच्या तुलनेत ५0.0४ टक्के इतकेच आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितले की, डिसेंबर अखेरपर्यंत रिझर्व्ह बँकेने सुमारे ४१ टक्के नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. जानेवारी अखेरपर्यंत हे प्रमाण ६0 टक्के होईल. केअर रेटिंग्ज या संस्थेचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की, अनेक बँकांमध्ये जमा असलेल्या नोटांबाबत वादही आहेत. या पार्श्वभूमीवर ३0 डिसेंबरनंतरही काही नोटा रिझर्व्ह बँकेकडे येऊ शकतात. १0 डिसेंबर २0१६ रोजी रिझर्व्ह बँकेने जमेचा आकडा १२.४४ लाख कोटींचा होता. त्यात सुधारणा केली जाऊ शकते. (वाणिज्य प्रतिनिधी)आकड्यांमध्ये असू शकतो घोळ ५ जानेवारीला जारी केलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँकांत जमा झालेल्या जुन्या नोटांची आकडेवारी रिझर्व्ह बँकेकडे आली आहे. हे आकडे आणि प्रत्यक्ष तिजोरीत असलेल्या नोटा यांचा मेळ घालून पाहण्याची गरज आहे. मोजदादीतील चुका अथवा एकच रक्कम दोन वेळा मोजली जाण्याची शक्यता असे प्रकार होऊ शकतात.असे प्रकार टाळण्यासाठी कागदावरील आकडे आणि तिजोऱ्यांतील नोटा यांचा मेळ घातला जात आहे. १0 डिसेंबर २0१६ रोजी रिझर्व्ह बँकेचा जमेचा आकडा 12.44लाख कोटींचा होता.