शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी कायम

By admin | Updated: October 18, 2016 11:19 IST

हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी रद्द करण्यासंदर्भातील मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरील स्थगितीला सुप्रीम कोर्टाने 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश पुन्हा लांबवणीवर पडला आहे. दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी रद्द करण्यासंदर्भातील मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरील स्थगितीला सुप्रीम कोर्टाने 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  सोमवारी याप्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे 'पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगितीची मुदत वाढवण्यात यावी', अशी विनंती हाजी अली दर्गा ट्रस्टचे वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर, आणि ए.एम खानविलकर यांच्या खंडपीठाला केली आहे.  सुब्रमण्यम यांची विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य देखील केली.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोपर्यंत हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी कायम असणार आहे. या आधी  झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने हाजी अली ट्रस्टला पुरोगामी भूमिका मांडण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार 'ट्रस्ट महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश देण्यावर रिती आणि कार्यपद्धतीच्या योजनांची सकारात्मक आखणी करत आहे', असे वकील सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे. 
 
आणखी बातम्या
हाजी अली दर्ग्यातील 'महिला प्रवेश' लांबणीवर
विशेष म्हणजे, हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन मुंबई हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. सध्या हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीला 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.