गारपीटीने निफाडला झोडपले
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
निफाड : शहर व परिसराच्या श्निवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गारपीटीने झोडपल्याने सर्वांचीच तारांबल उडाली. गारपिटीमुले द्राक्षबागांसह, कांदा व गहू पिकांडेही मोठे नुकसान झाले आहे.
गारपीटीने निफाडला झोडपले
निफाड : शहर व परिसराच्या श्निवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गारपीटीने झोडपल्याने सर्वांचीच तारांबल उडाली. गारपिटीमुले द्राक्षबागांसह, कांदा व गहू पिकांडेही मोठे नुकसान झाले आहे.शुक्रवारी सायंकाळी पावसाने प्रारंभ केल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. शनीवलारी सकाळी पुन्ही पाऊस झाला. दुपारी १२ वाजेपर्यंत अधून-मधून पाऊस पडत होता. दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पाऊसाने विश्रांती घेतल्यानंतर पावणेसहाच्या सुमारास अचानक वादली वार्यासह जोरात पाऊस झाल्याने निफाड शहरात नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. जवळजवळ २५ मिनिटे मोठमोठ्या गारांनी निफाडला झाडपले.निफाडच्या रस्त्यांवर गारांचे अक्षरश: थर साडले होते.गारपीटीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने सर्व द्राक्षे खराब होण्याची शक्यता वाढली आहे.निफाडसह तालुक्यातील जळगाव, कुरुडगाव, काथरगाव, शिवर, दिंडोरी (तास), नांदूरमध्यमेश्वर, कोळवाडी, सोनेवाडी, उगांव, शिवडी आदि गावांनाही गारपिटीने झोडपरल्याने द्राक्ष, कांदा, गहू उत्पादनकांचे मोठ्या स्वरुपात नुकसान झाले आहे.मोठमोठ्या गारांनी झोडपल्याने बहुतांशी कांदा उत्पादकांच्या शेतातील कांद्याची वात शिल्लक न राहिल्याने कांदे सडण्याची शक्यता वाढली आहे. तसेच गहू पिकालाही झोडपल्याने गहु उत्पादनांवर परिणाम होणार आहे.गारपीटीमुळे निलगीरी, गुलमोहर या झाडांची जवळजवल पानगळ झालेली पहावयास मिळत होती.एवढ्यामोठ्या स्वरुपात निफाड शहरात व इतर वरील गावात गारा पडण्याची पहिलीच वेळ असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.गेल्या सह महिन्यात दोन-तीन वेळा गारपीटीने तालुक्याला झोडपल्याने द्राक्षबागायदार हवालदिल झाले. त्यात सध्या द्राक्षविक्रीच्या हंगाम चालू असून सध्या झालेल्या पावसामुले द्राक्षव्यापार्यांनीही द्राक्ष खरेदी करणे थांबवले शनीवारी तालुक्यातील जवळजवळ भागात द्राक्षखुडे व्यापार्यांनी बंद केले होते. या पावसामुळे द्राक्षमण्यांवर पाणी पडल्याने त्याचा पापुद्रा निघून मण्यात पाणी शिरल्याने द्राक्षघड सडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने या द्राक्षबागांना कोणी व्यापारी विचारत सुद्धा नाहीत.द्राक्षाचे भाव उतरले आहेत. त्या द्राक्षबागा वाईनरीसाठी, बेदाण्यासाठी ११ ते १३ रुपये भावांना पोहचवावा लागत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.(वार्ताहर)----