गुरुमाऊलींच्या जयंती महोत्सवास आजपासून प्रारंभ
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
आकोट : गुरुमाऊली श्रीसंत वासुदेव महाराज यांचा ९८ वा जयंती महोत्सव १४ फेब्रुवारीपासून श्रीक्षेत्र श्रद्धासागर दर्यापूर रोड, आकोट येथे भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ होत आहे.
गुरुमाऊलींच्या जयंती महोत्सवास आजपासून प्रारंभ
आकोट : गुरुमाऊली श्रीसंत वासुदेव महाराज यांचा ९८ वा जयंती महोत्सव १४ फेब्रुवारीपासून श्रीक्षेत्र श्रद्धासागर दर्यापूर रोड, आकोट येथे भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ पहाटे गुरुमाऊलींचा अभिषेक गुरुमाऊलींचे भक्त मधुकरराव तराळे यांच्या हस्ते करून होणार आहे. यावेळी तीर्थस्थापना व महापूजन संस्थेचे विश्वस्त दादाराव पुंडेकर यांचे हस्ते होईल. सकाळी ९ वा. सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ वा. जगदीश महाराज ठोकळ वाघागड, दु.४ वा. श्री ज्ञानेश्वरी भावकथा, रात्री ८ वा. प्रभाकर महाराज गंगाखेडकर परभणी यांचे कीर्तन होईल. पारायणपीठाचे नेतृत्व अंबादास महाराज व वासुदेवराव महाराज अस्वार करतील. १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या महोत्सवात श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन प्रवचनादी कार्यक्रमासह पुरुषोत्तम महाराज बावस्कर जळगाव जामोद यांचे श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण दररोज दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक उपक्रमांना नामवंत साधू-संत, महाराज, बुवा मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन संस्थेद्वारा करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)फोटो : १३एकेटीपी०५.जेपीजी................