जालंधर : गुरमेहर कौर या विद्यार्थीनीला धमकी देणाऱ्यास अटक करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्या संघटनेवर कारवाई व्हायला हवी, असे मतही संघाचे प्रांत संघचालक बृजभूषण सिंह बेदी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, महिलेच्या किंवा तरुणीच्या विरुद्ध अपमानास्पद शब्दांचा वापर करणे संस्कृतीच्या विरुद्ध आहे. संघ याच्या विरुद्ध आहे. सरकारने या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि यात दोषी आढळणारा मग तो कोणत्याही संघटनेचा अथवा राजकीय पक्षाचा का असेना त्याच्याविरुद्ध कारवाई करावी. (वृत्तसंस्था)
गुरमेहरला धमकी देणाऱ्यास अटक करा : संघ
By admin | Updated: March 4, 2017 04:44 IST