शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या बैठकीत गुलाबरावांचा निषेध जिल्हा बैठक: विकासाशी स्पर्धा करण्याचे आवाहन

By admin | Updated: December 12, 2015 00:30 IST

जळगाव : शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेचा भाजपाच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात येऊन त्यांनी स्पर्धा करायचीच तर विकासाशी करावी असे आवाहन करण्यात आले.

जळगाव : शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेचा भाजपाच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात येऊन त्यांनी स्पर्धा करायचीच तर विकासाशी करावी असे आवाहन करण्यात आले.
भाजपाची जिल्हा बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली. जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विभागीय संघटनमंत्री ॲड. किशोर काळकर, बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, गोविंद अग्रवाल, सुरेश धनके, हिरालाल चौधरी, देवयाची ठाकरे, प्रा. सुनील नेवे, जिल्हा सरचिटणीस डॉ. विजय धांडे, सदाशिव पाटील, अनंतराव कुलकर्णी, दीपक सुर्यवंशी, दीपक फालक, अमोल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. बैठकीत प्रारंभी संघटनात्मक निवडणुका व तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण वगाचा आढावा मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून घेण्यात आला. जि‘ात भाजपाचे पाच लाखांच्या वर प्राथमिक सदस्य झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले. पक्ष जिल्‘ात मजबुत व भक्कम होत असून महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना राबविल्या जात आहेत. या सर्व बाबींचा धसका घेऊन शिवसेना उपनेते आमदार गुलराबराव पाटील हे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांना स्पर्धा करायची असेल तर ती विकासाशी करावी असे आवाहन करून पाटील यांच्या भूमिकेच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. ॲड. किशोेर काळकर यांची विभागीय संघटनमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल व उदय वाघ यांची उत्तर महाराष्ट्र निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे जिल्‘ातील पदाधिकारी उपस्थित होते.