शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

चिक्की घोटाळ्याच्या आरोपामागे गुजराती लॉबी

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

- सूर्यकांता संस्थेने सर्व आरोप फेटाळले

- सूर्यकांता संस्थेने सर्व आरोप फेटाळले
वेंगुर्ले (जि. रत्नागिरी) : संपूर्ण राज्यात चिक्की घोटाळ्यावरून रान पेटले असतानाच सरकारला चिक्की पुरवणार्‍या सूर्यकांता महिला सहकारी संस्थेने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. यामागे गुजराती उद्योगपतीची लॉबी काम करीत असून, आरोपामागे त्यांचाच हात असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप होत आहे. सूर्यकांता महिला सहकारी संस्थेला मिळालेल्या ८० कोटी रुपयांची चिक्की पुरविण्याच्या ठेक्यावरून ही संस्था देखील संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर वेतोर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सूर्यकांता महिला सहकारी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी हा दावा केला.
सन २००५मध्ये स्थापन झालेली सूर्यकांता महिला सहकारी संस्था २००८मध्ये रजिस्टर करून २०१०मध्ये तिचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर २०११मध्ये चिक्की बनविण्यास मान्यता मिळाली. २०१३मध्ये चिक्की पुरवण्याची पहिली ऑर्डर मिळाली. आमची संस्था एकमेव खासगी सहकारी संस्था असून, सध्या वेतोरे येथील युनिटकडून २०० टन चिक्कीचे उत्पादन सुरू असल्याची माहिती गावडे यांनी दिली.
आम्हाला मिळालेली ऑर्डर ८० कोटींची नसून, ती ७४ कोटींची होती. त्यामध्ये ५२ कोटी मायक्रो न्युट्रियन्ट व २२ कोटी राजगिरा चिक्कीची ऑर्डर होती. चिकीसाठी लागणारा शेंगदाणा, गूळ आदी उच्च दर्जाचे वापरत आहोत. २०१३ मध्ये झालेली राजकीय तक्रार वगळता एकही तक्रार आमच्या चिक्की उत्पादनाबाबत नाही, असे गावडे म्हणाले. (प्रतिनिधी)