शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 72 बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 12:28 IST

देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळं पाच राज्यातील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळं आलेल्या पुरानं आतापर्यंत 70 जणांचा बळी घेतला आहे. हवामान विभागाने या पाच राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच येणाऱ्या दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र , बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नदी, नाले व रस्ते पाण्याखाली गेल्याने गुजरातमधील रस्ते व रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 900 जनावरांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर आणि हवाईदलाला पाचारण करण्यात आले आहे. मोर्बी, राजकोट, सुरेंद्रनगर, बनासकांठा आणि अहमदाबाद जिल्हे पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी सरकारी इमारती व शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजप्रवाह ठप्प झाले आहेत. 19 राज्यमार्ग आणि 102 अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नुकतीच सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पूरग्रस्त भागात अन्नाची पाकिटं व पाणी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा कॉलेजस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.