शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे गुजरातचे नवीन प्रभारी असतील. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सातव यांना सूत्रे हाती घेण्यास सांगितले आहे. अशोक गेहलोत सध्या सरचिटणीस म्हणून पक्ष संघटनांची जबाबदारी पाहत आहेत. सातव यांना सरचिटणीस करण्यात येण्याची शक्यता आहे.राहुल यांनी गेहलोत यांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष द्यायला सांगितले आहे. ओडिशात बी. के. हरिप्रसाद यांच्या जागी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना नेमले आहे. काँग्रेस सेवा दलाचे मुख्य संघटक म्हणून लालजीभाई देसाई यांना नेमले आहे.प्रदेशाध्यक्षही बदलणारसरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडील जबाबदारी गेहलोत यांना दिली आहे. राहुल गांधी लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता असून, त्यात महाराष्टÑाचाही समावेश असू शकेल.
सातवांकडे गुजरातची सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:01 IST