शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गुजरात निवडणुकीचे निकाल हाती येण्याअगोरच 'आप'ची पोस्टरबाजी; राष्ट्रीय पक्ष असल्याचा केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:16 IST

गुजरातम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. गुजरातमध्ये  भाजपा विरोधात आम आदमी पक्षाने तगडे आवाहन दिले आहे.

गुजरातम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. गुजरातमध्ये  भाजपा विरोधात आम आदमी पक्षाने तगडे आवाहन दिले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केले आहे. बुधवार, 7 डिसेंबर रोजी झालेल्या एमसीडी निवडणुकीच्या निकालानंतर 'आप'ने दिल्लीत पोस्टर्स लावले आहेत.

हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  या पोस्टवर "आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष झाल्याबद्दल सर्व देशवासियांचे अभिनंदन." असं लिहिले आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी तीन मुख्य अटींपैकी एक पूर्ण करणे आवश्यक आहे. लोकसभेच्या चार जागांव्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाला लोकसभेत 6 टक्के मते मिळाली पाहिजेत. किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये 6 टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळाली पाहिजेत.

आप दिल्ली आणि पंजाबमध्ये बहुमताने सरकार चालवत आहे. गुजरात निवडणुकीनंतर 'आप' राष्ट्रीय पक्ष होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्याचे अनेक फायदे आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर त्या पक्षाला आरक्षित निवडणूक चिन्ह मिळते. अशा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून काही विशेष अधिकार आणि सुविधा मिळतात.

Gujarat Election Result 2022 Live : AAP चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पिछाडीवर, गुजरातमध्ये भाजपच वरचढ

निवडणुकीच्या काही काळापूर्वी या पक्षांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर दूरचित्रवाणी आणि रेडिओ प्रसारणासाठीही वेळ दिला जातो. त्यांचा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते याचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढते. राष्ट्रीय माध्यमांवर विनामूल्य एअरटाइम देखील उपलब्ध आहे. त्यामुळे पक्षाचा आवाका वाढवणे सोपे जाते.तर आता आज गुजरातच्या निकालावरुन आप राष्ट्रीय पक्ष होणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Gujarat Election Result 2022 Live)

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022AAPआपBJPभाजपा