नवी दिल्ली : गुन्हे, भयकथा आणि थरारपट लिहिणाऱ्या लेखकांचा द्विदिवसीय महोत्सव ‘क्राईमफेस्ट’ शनिवारपासून येथे सुरू होत असून जगभरातील गुन्हेकथा लेखक या निमित्ताने एकत्र येत आहेत. गुन्हेकथा लिहिण्याची कला आणि त्याचा समाजावर पडणारा प्रभाव या अनुषंगाने चर्चा होणार आहे.पटकथालेखक, दिग्दर्शकही सहभागी होत असून चित्रपट व दृश्य माध्यमांवर मते मांडतील. दक्षिण आशिया क्राईम रायटर फोरमने हा इंडिया हॅबिटॅट सेंटर तसेच आॅक्सफर्ड बुकस्टोअर येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीत आजपासून गुन्हे लिखाण महोत्सव
By admin | Updated: January 17, 2015 02:45 IST