शिक्षणातील आरक्षणाबाबत मार्गदर्शन शिबिर
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
पनवेल : सर्वशिक्षण अभियानाअंतर्गत सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासन देखील प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी शाळा प्रवेशात असलेल्या २५ टक्के आरक्षणाबाबतची माहिती देण्यासाठी युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी सायंकाळी ५ वाजता पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिक्षणातील आरक्षणाबाबत मार्गदर्शन शिबिर
पनवेल : सर्वशिक्षण अभियानाअंतर्गत सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासन देखील प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी शाळा प्रवेशात असलेल्या २५ टक्के आरक्षणाबाबतची माहिती देण्यासाठी युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी सायंकाळी ५ वाजता पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खारघरमधील रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूलमध्ये हे मार्गदर्शन शिबिर पार पडणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, शिक्षण अभ्यासक चेतन गायकवाड यांच्यासह पनवेलचे आमदार हे याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खारघरसह आजूबाजूच्या परिसरातील पालक, विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा प्रेरणा संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)