शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’चा दर गुरुवारी

By admin | Updated: October 18, 2016 06:04 IST

जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होत असून गुरुवारी ती संपेपर्यंत देश पातळीवर लागू करायच्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) दर ठरविला जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : ‘जीएसटी’ परिषदेची तीन दिवसांची बैठक उद्यापासून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होत असून गुरुवारी ती संपेपर्यंत देश पातळीवर लागू करायच्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) दर ठरविला जाण्याची शक्यता आहे. ही नवी करप्रणाली लागू झाल्यावर महसूलात येणाऱ्या तुटीपोटी राज्यांना पुढील पाच वर्षे द्यायच्या भरपाईचे सूत्रही या बैठकीत ठरेल.सर्व राज्यांचे वित्तमंत्री पदसिद्ध सदस्य असलेल्या या परिषदेत सर्व विविद्य मुद्द्यांवर सर्वसहमतीने निर्णय घेण्यासाठी जेटली यांनी २२ नोव्हेंबरची मुदत अपेक्षित ठेवली आहे. त्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे. ‘जीएसटी’ लागू झाल्यावर सध्याचा सेवाकर त्यातच अंतर्भूत केला जाईल. तरीही सध्याच्या ११ लाख सेवाकरदात्यांचे ‘जीएसटी’चे करनिर्धारण आपल्याकडेच ठेवण्याचा केंद्राचा विचार आहे. काही राज्यांचा यास विरोध आहे. सरकारने १ एप्रिलपासून ‘जीएसटी’ लागू करण्याचा निर्धार केला आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारला संसदेत केंद्रीय जीएसटी व एकात्मिक जीएसटी संबंधीची विधेयके मंजूर करून घ्यावी लागतील. त्यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन १६ नोव्हेंबरला सुरु होण्याआधी परिषदेस मतभेदाचे विषय हातावेगळे करावे लागतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)