शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचे दर : अन्नधान्य, दूध करमूक्त तर एसी-फ्रिज होणार स्वस्त

By admin | Updated: May 18, 2017 21:40 IST

वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटी अंतर्गत वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या कराच्या दरांबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये एकमत झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटी अंतर्गत वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या कराच्या दरांबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये अखेर एकमत झाले आहे. जीएसटी प्रणालीनुसार गुरूवारी जीएसटी परिषदेने एकूण 1211 वस्तूंचे दर निश्चित केले आहेत.  या धोरणातून धान्य आणि दूध करमूक्त करण्यात आले आहेत तर एसी आणि फ्रिजसारख्या अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. आज श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसीय जीएसटीच्या काउंसिल बैठकीत दैनंदिन वस्तुंवरील टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
जीएसटी परिषदेची पहिली बैठक झाली. बैठकीत एकूण 1211 वस्तूंचे दर जीएसटीनुसार निश्चित करण्यात आले.  यामध्ये अनेक वस्तूंवरील कर कमी झाले आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले.आज चर्चा झालेल्या वस्तूंमध्ये 81 टक्के वस्तूंवर 18 टक्के आणि त्याहून कमी कर लावण्यात आला आहे. केवळ 19टक्के वस्तूंवर सर्वाधिक 28 टक्के कर निश्चित करण्यात आला आहे.  तर सोने आणि बीडीवर किती टॅक्स लावला जाणार यावर उद्या, शुक्रवारी निर्णय होणार आहे. सर्विस टॅक्सचे दर दुसऱ्या दिवशी ठरवण्यात येणार आहेत.
 
दूध जीएसटीमधून वगळण्यात आलं आहे. मिठाई, साखर , चहापत्ती, कॉफी आणि कोळश्यावर 5 टक्के लावण्यात आला आहे. टूथपेस्ट , हेअर ऑईल आणि साबणावर 18 टक्के टॅक्स लावला आहे. सध्या या वस्तुवर 28 टक्के टॅक्स लावला जातो. कोळसा आणि मसाल्यांवर 5 टक्के टॅक्स, करमणूक, हॉटेल आणि रेस्टॉरेंटवर 18टक्के टॅक्स लागणार आहे. छोट्या कारवर 28 टक्के टॅक्ससह अतिरिक्त कर लावला जाणार आहे. लक्झरी कारवर टॅक्ससोबतच 15 टक्के अतिरिक्त कर लावला जाईल. एसी आणि फ्रिजला सुद्धा 28 टक्के टॅक्सच्या गटात ठेवण्यात आले आहे. सध्या यावर 30 ते 31 टक्के टॅक्स लावला जातो. तर अन्नधान्य स्वस्त होणार आहे.