शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी, भूसंपादन विधेयक संमत होणे जरुरी -जेटली

By admin | Updated: July 5, 2015 23:39 IST

संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असतानाच वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि भूसंपादन विधेयक पारित करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला.

नवी दिल्ली : संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असतानाच वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि भूसंपादन विधेयक पारित करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. रोजगार निर्मिती आणि गरिबी निर्मूलनासाठी या उपाययोजना आवश्यक आहेत, असे जेटली म्हणाले. गुंतवणूक चक्रात हळूहळू सुधारणा होत आहे आणि प्रलंबित प्रकल्प वेगाने सुरू होत आहेत, हे ताज्या आकडेवारीवरून दिसते. जीएसटी विधेयक पारित झाल्याने आणि भूसंपादन कायद्यात दुरुस्ती केल्याने गुंतवणूकही वाढेल, असे जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. ललित मोदी वाद गाजत असतानाच जेटली यांनी जीएसटी व भूसंपादन विधेयक पारित करण्याचे आवाहन केले आहे. या ललितगेट प्रकरणावरून संसद अधिवेशन ठप्प पाडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे आगामी अधिवेशन वादळी राहण्याची शक्यता आहे.राज्यसभेची प्रवर समिती जीएसटी विधेयकाची तर संयुक्त संसदीय समिती भूसंपादन विधेयकाची समीक्षा करीत आहे. या दोन्ही समित्या आपापला अहवाल संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या सुरुवातीला सादर करण्याची शक्यता आहे. सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेबाबत बोलताना जेटली म्हणाले, सरकार एकाच वेळी विविध प्रकारच्या उपाययोजनांच्या माध्यमातून ८-१० टक्के विकास दरासाठी अनुकूल असे वातावरण तयार करीत आहे. सरकार खासगी गुंतवणूक वाढविण्यासाठीही अनुकूल परिस्थिती निर्माण करीत आहे. जीएसटीचा अंमल, भूसंपादन कायद्यातील सुधारणा, व्यवसायातील उत्पादन खर्चात घट आणि प्रलंबित प्रकल्प सुरू करणे यासारख्या उपाययोजनांमुळे गुंतवणुकीची स्थिती सुधारणार आहे. (वृत्तसंस्था)