शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जमीन, घरभाड्याला जीएसटीचा फटका

By admin | Updated: March 29, 2017 04:25 IST

जमीन अथवा इमारत भाड्याने दिल्यास येणाऱ्या भाड्यावर वस्तू व सेवाकर (जीएसटी) द्यावा लागणार आहे. १ जुलैपासून

नवी दिल्ली : जमीन अथवा इमारत भाड्याने दिल्यास येणाऱ्या भाड्यावर वस्तू व सेवाकर (जीएसटी) द्यावा लागणार आहे. १ जुलैपासून जीएसटी लागू होताच हा नवा कर द्यावा लागेल. याशिवाय बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या हप्त्यांवरही जीएसटी कर द्यावा लागणार आहे.जमीन अथवा घरांच्या विक्रीवर मात्र जीएसटी लागणार नाही. त्यावर सध्याप्रमाणेच मुद्रांक शुल्क लागेल. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत सादर केलेल्या जीएसटीशी संबंधित विधेयकांत ही तरतूद करण्यात आली आहे. विजेलाही जीएसटीतून वगळण्यात आले आहे. येत्या १ जुलैपासून संपूर्ण देशात जीएसटी लागू होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवाकर आणि राज्यांचे व्हॅट हे कर जीएसटीमध्ये विलीन होणार आहेत. केंद्रीय जीएसटी (सी-जीएसटी) विधेयकातील तरतुदीनुसार, कुठल्याही स्वरूपात जमीन भाड्याने दिल्यास त्याला सेवा पुरवठा म्हणूनच गृहीत धरले जाईल. त्यापोटी मिळणारी रक्कम जीएसटीनुसार करपात्र असेल. याशिवाय व्यावसायिक, औद्योगिक अथवा निवासी इमारती या व्यवसायासाठी अथवा अन्य कुठल्याही वाणिज्यिक कारणासाठी भाड्याने दिल्यास त्यालाही सेवा पुरवठा म्हणूनच गृहीत धरले जाईल. संपूर्ण इमारत अथवा इमारतीचा काही भाग भाड्याने दिला असला तरी हा नियम लावला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)हप्त्यांबाबत अस्पष्टताया विधेयकाच्या तरतुदीनुसार, जमीन अथवा इमारतीची विक्री सेवा पुरवठा म्हणून गृहीत धरली जाणार नाही. त्यामुळे त्यावर जीएसटी लागणार नाही. मात्र बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची विक्री सेवा पुरवठ्यातच येईल. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेल्या घराचे बांधकाम सुरू असेल तर त्याच्या हप्त्यावर तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. मात्र तो किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.व्यावसायिक वापरासाठी जमीन किंवा घर, इमारत भाड्याने देताना सध्या सेवा कर आकारला जातो. तसाच तो यापुढे जीएसटी आकारला जाईल. हेच जर निवासी वापरासाठी असेल तर कर लागणार नाही. - उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंटजीएसटी विधेयक एकमताने मंजूर व्हावे, हीच केंद्राची अपेक्षावस्तू व सेवा कराशी संबंधित ४ विधेयकांना सर्वपक्षीय सहमतीने मंजूर करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. बुधवारी लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी ७ तासांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. तथापि, ज्या स्वरूपात ही विधेयके संसदेत सरकारने सादर केली आहेत, ती काँग्रेसला मंजूर नाहीत साहजिकच सरकारला अपेक्षित सहकार्य, संसदेतला सर्वांत मोठा विरोधी पक्ष काँग्रेसकडून मिळण्याची शक्यता दिसत नाही.