शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी; काँग्रेससह विरोधकांचा सशर्त पाठिंबा

By admin | Updated: August 26, 2015 03:50 IST

सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पार पाडण्याची जय्यत तयारी चालविली असताना काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीसरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पार पाडण्याची जय्यत तयारी चालविली असताना काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी कोणतेही ठोस आश्वासन देण्याचे टाळत सुचविलेल्या दुरुस्त्या मान्य केल्या तरच सहकार्य या शब्दांत सशर्त समर्थनाचे संकेत दिले आहे. काँग्रेसने ठोस पाठिंबा न दिल्याने सरकारने विरोधकांशी सल्लामसलतीच्या प्रक्रियेला वेग दिला असला तरी अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाबाबत संभ्रमाची स्थिती आहे.महत्त्वपूर्ण जीएसटी विधेयक संमत करण्यासाठी मोदी सरकारने संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांना कामाला लावले आहे. या मंत्र्यांनी घरी चकरा मारूनही विरोधी पक्षनेत्यांनी भीक घातलेली नाही. नायडूंनी काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुचविलेल्या सुधारणा मान्य करा तरच समर्थन मिळेल या शब्दांत खरगे यांनी त्यांना सुनावले. डावे पक्ष, समाजवादी पक्ष, टीएमसीनेही विधेयकावर सहमती झाली तरच साथ देण्याची भाषा केली आहे. सरकारची स्थिती ‘न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी’ अशी झाली आहे. विरोधी बाकावर असताना ज्या मुद्यांना विरोध चालविला होता, त्याच काँग्रेसच्या अटी स्वीकाराव्या लागणार अशा खिंडीत भाजप सापडला आहे.संयुक्त अधिवेशन अशक्यचघटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे संयुक्त अधिवेशन बोलावत संख्याबळाच्या आधारावर विधेयक संमत करवून घेण्याचा मार्ग सरकारला अवलंबता येणार नाही. त्यामुळेच जेटली,नायडू, मुख्तार अब्बास नकवी यांच्यासारख्या नेत्यांना विरोधकांकडे हात पसरावे लागत आहे. नायडूंचे आवाहनसरकारने अधिवेशन बोलावण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत चालविली असल्याचे नायडू यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. नायडूंनी मंगळवारी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन संसदेत सहकार्य देण्याची विनंती केली. जीएसटी, स्थावर मालमत्ता नियमन आणि भूसंपादन ही तिन्ही विधेयके महत्त्वाची असून ती संमत होण्यात विलंब होणे म्हणजे देशाच्या इच्छाआकांक्षेला विशेषत: नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या युवकांच्या स्वप्नांना हादरा देणारे ठरेल तसेच विकासाचा वेग मंदावण्याची जोखीम उद्भवेल. हे विधेयक संमत झाल्यास देशाच्या विकासदरात (जीडीपी) १.५ ते २ टक्क्यांची भर पडेल, असे त्यांनी मुडीसारख्या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेच्या अभ्यासाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.