डेहराडून : वस्तू व सेवाकर विधेयक (जीएसटी) उत्तराखंड विधानसभेत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आले. यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. पहिल्या दिवशी विधेयक सभागृहात मांडण्यात आले व दुसऱ्या दिवशी ते पारित करण्यात आले. या विधेयकाद्वारे १७ वेगवेगळ्या प्रकारचे कर जाऊन एकच कर अस्तित्वात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी सांगितले की, जीएसटी लागू करण्यात कसल्याही अडचणी येणार नाहीत.
जीएसटी विधेयक उत्तराखंडात मंजूर
By admin | Updated: May 3, 2017 00:50 IST