फुटाणे विक्री करणार्या करणार्या वृध्देला ट्रकने चिरडले
By admin | Updated: December 28, 2015 00:06 IST
नशिराबाद : शेंगदाणे व फुटाणे विक्री करणार्या महिलेला भरधाव वेगाने येणार्या ट्रकने चिरडल्याने सरुबाई नथ्थू भोई (वय ७०, रा.भोईवाडा नशिराबाद) ही वृध्दा जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजता सुनसगाव रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. या अपघातप्रकरणी ट्रकचालक किशोर रतन परदेशी (रा.रायपुर, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फुटाणे विक्री करणार्या करणार्या वृध्देला ट्रकने चिरडले
नशिराबाद : शेंगदाणे व फुटाणे विक्री करणार्या महिलेला भरधाव वेगाने येणार्या ट्रकने चिरडल्याने सरुबाई नथ्थू भोई (वय ७०, रा.भोईवाडा नशिराबाद) ही वृध्दा जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजता सुनसगाव रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. या अपघातप्रकरणी ट्रकचालक किशोर रतन परदेशी (रा.रायपुर, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.भोई वाड्यात राहणार्या सरुबाई या रविवारी नेहमीप्रमाणे फुटाणे विक्री करण्यासाठी घरुन निघाल्या असता रस्त्यातच शाळेजवळ सुनसगावकडे भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने (क्र.एम.एच.१९ झेड ३०६८) मागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच अंत झाला. अपघाताची माहिती मिळताच मोहन भोई, शुभम साळी, कृष्णा भोई आदींनी ट्रकचालकाचा पाठलाग केला असता चालकाने त्यांच्याही अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न केला.नंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. फकीरा चांगो भोई यांच्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरुबाई यांच्या अपघाती निधनामुळे भोई वाड्यात प्रचंड आक्रोश करण्यात आला. त्यांच्या पात दोन मुले, सहा मुली, सुना, जावाई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.