शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बड्या आॅनलाइन कंपन्याही विकणार किराणा

By admin | Updated: July 13, 2017 00:05 IST

आॅनलाइन किरकोळ विक्री क्षेत्रातील बलाढ्या बहुराष्ट्रीय कंपनी अ‍ॅमेझॉन डॉट कॉमला भारतातील किरकोळ खाद्य विक्री क्षेत्रात गुंतवणुकीस परवानगी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आॅनलाइन किरकोळ विक्री क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी अ‍ॅमेझॉन डॉट कॉमला भारतातील किरकोळ खाद्य विक्री क्षेत्रात गुंतवणुकीस परवानगी मिळाली आहे. या परवान्याच्या आधारे अ‍ॅमेझॉन खाद्य आणि किराणा वस्तूंचा साठा करून किरकोळ स्वरूपात विकू शकेल. भारतात अ‍ॅमेझॉनची फ्लिपकार्टसोबत स्पर्धा आहे. भारतातील किरकोळ खाद्य विक्री क्षेत्रात प्रवेशाची परवानगी मिळाल्याच्या वृत्ताला अ‍ॅमेझॉनकडून अधिकृत दुजोरा मिळाला आहे. तथापि, यासंबंधीचा तपशील देण्यास कंपनीने नकार दिला आहे. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, खाद्य क्षेत्रात अ‍ॅमेझॉन ५00 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. भारतातील विविध क्षेत्रांतील गुंतवणूक ५ अब्ज डॉलरवर नेण्याचा निर्धार कंपनीने आधीच व्यक्त केला आहे. भारतात आॅनलाइन खरेदीला मोठी गती मिळाली आहे. स्वस्त स्मार्टफोन, इंटरनेटचा प्रसार आणि सवलती यामुळे आॅनलाइन शॉपिंगला पसंती मिळत आहे. गॅझेटपासून ते कपडे आणि खाद्यवस्तंूपर्यंत सर्वच क्षेत्रांत आॅनलाइन शॉपिंग होत आहेत. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न अ‍ॅमेझॉन करीत आहे.दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या विक्रीत अजूनही किराणा दुकानांचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुळे या क्षेत्रात संघटित प्रतिष्ठानांना मोठी संधी आहे. सध्या अ‍ॅमेझॉन भारतात अ‍ॅमेझॉन पॅन्ट्रीच्या माध्यमातून खाद्य उत्पादने विकते. आपल्या अ‍ॅमेझॉन नाऊ अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनी विविध किराणा वस्तूंची ‘त्याच दिवशी पोहोच’ या तत्त्वावर आॅनलाइन विक्री करते. त्यासाठी अ‍ॅमेझॉनने बिग बाजार, स्टार बाजार आणि हायपरसिटी या किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांशी भागीदारी केली आहे. अ‍ॅमेझॉन आॅनलाइन आॅर्डर स्वीकारते. प्रत्यक्ष वस्तू पोहोचविण्याच्या कामी भागीदार कंपन्या साह्य करतात. >फ्लिपकार्टचाही प्रयत्नभारतातील अ‍ॅमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनेही किराणा सामान विक्री क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न चालविला आहे. फ्लिपकार्टची टायगर ग्लोबल, टेन्सेन्ट होल्डिंग्ज आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांसोबत भागीदारी आहे. अ‍ॅमेझॉनने गेल्याच महिन्यात किराणा सामान विक्री क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी होल फूड मार्केट आयएनसी खरेदी करण्याच्या योजनेची घोषणा केली होती. हा व्यवहार १३.७ अब्ज डॉलरचा आहे.