राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ५८ व्या स्मृती दिनानिमित्त धोबी युवा मंचच्या वतीने सिडको येथील गाडगेबाबा समाज मंदिरात अभिवादन सभा घेण्यात आली़
राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन
कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ५८ व्या स्मृती दिनानिमित्त धोबी युवा मंचच्या वतीने सिडको येथील गाडगेबाबा समाज मंदिरात अभिवादन सभा घेण्यात आली़सकाळी दहा वाजता चैतन्यनगर येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक येथे प्रतिमेचे पुजन करण्यात आले़ यावेळी अभिवादन सभेला प्रा़योगेश अंबुलगेकर, संतोष तेलंग यांनी समाजाची दिशा आणि दशा या विषयावर मार्गदर्शन केले़ यावेळी हनमंत गोरठेकर, अंगद परदेशी, रवी तेलंग, पिंटू वाघमारे, दिलीप तेलंग, भरत शिंदे, मधुकर हरनाळे, साईनाथ कापसे, अजय रामतिर्थकर, विक्रम भंडारे, दत्ता हुस्सेकर, गजानन सुर्यवंशी, गजानन मोकले, गजानन पाटील, संजय सुर्यवंशी यांची उपस्थिती होती़