शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहराच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा ग्रीहा परिषद समारोप : गिरीश महाजन यांची अपेक्षा

By admin | Updated: December 5, 2015 23:51 IST

जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली.

जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली.
सातव्या प्रादेशिक ग्रीहा परिषदेचा शनिवारी येथील जैन हिल्सवर समारोप झाला. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आमदार किशोर पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष अनीश शाह, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर आदी उपस्थित होते.
महाजन पुढे म्हणाले प्रत्येकाने पाण्याचा जबाबदारीने वापर केला पाहीजे. शहरांमध्ये ३५ टक्के पाण्याची गळती होते. त्याही समस्येचा सामना आपल्याला करावयाचा आहे. शहरातील सांडपाण्यावर भविष्यात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे हवामान बदलाचे संकट आपल्यापुढे आहे. जैन इरिगेशचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी देशाच्या शाश्वत विकासासाठी शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीय करण्याची गरज बोलून दाखविली. देशातील ६० टक्के लोक खेड्यात रहात असून शहरेसुद्धा त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शहरांसोबत खेड्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीय करायला पाहीजे. जोपर्यंत मने आणि विचार स्मार्ट होणार नाहीत, तोपर्यंत स्मार्ट शहरे निर्माण होणार नाहीत असेही ते म्हणाले.
विकासाची नांदी
स्मार्ट शहरांसंदर्भातील परिषद म्हणजे शहरासाठी भविष्यातल्या विकासाची नांदी असून शहर विकासासाठी आपण पुढाकार घेऊ असे मनपा आयुक्त संजय कापडणीस म्हणाले. भरत अमळकर यांचेही भाषण झाले. प्राचार्या वर्षा चोरडिया यांनी सूत्रसंचालन तर पूर्वा केसकर यांनी आभार मानले.
-----
फोटो कॅप्शन
ग्रीहा परिषद समारोप सत्रात बोलताना गिरीश महाजन. सोबत व्यासपीठावर अनीश शाह, भरत अमळकर, संजय कापडणीस, अतुल जैन, आमदार किशोर पाटील, राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर.
फोटो नंबर ०६सीटीआर ५६ व ५७